ED Raid On Vinay Aranha | पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हाना यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर ईडीचा छापा, ED नं केली कसून चौकशी

0
984
ED Raid On Vinay Aranha | ED raids bungalow and office of Vinay Arana, director of renowned Rosary School in Pune, ED conducts thorough investigation
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ED Raid On Vinay Aranha | पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे (Seva Vikas Co-Operative Bank) माजी चेअरमन अमर मूलचंदानी (Former Chairman Amar Mulchandani) यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने Directorate of Enforcement (ईडी- ED) शुक्रवारी आणि शनिवारी छापा टाकले. तसेच पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हाना (Rosary School Director Vinay Aranha) यांच्या कार्यालयावर आणि बंगल्यावर देखील शुक्रवारी आणि शनिवारी देखील छापे (ED Raid On Vinay Aranha) टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

 

सेवा विकास बँक आणि इतर एका खासगी बँकेकडे बनावट कागदपत्र (Fake Document) सादर करुन विनय आर्‍हाना यांनी कोट्यवधीचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर ईडीने आर्‍हाना यांच्या कार्य़ालयावर आणि बंगल्यावर छापेमारी केली. आर्‍हाना यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे इतर बँकामधून देखील मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचा संशय ईडीला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्‍हाना यांची 27 आणि 28 जानेवारी रोजी कसून चौकशी केली. चौकशी नंतर आर्‍हाना यांची शनिवारी ‘मुक्तता’ करण्यात आली. (ED Raid On Vinay Aranha)

 

काय आहे प्रकरण?
सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. याप्रकरणात जवळपास 430 कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतपेडीची क्षमता व अन्य निकष तापसले नाही. यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सह आयुक्त राजेश जाधवर (Joint Commissioner of Co-operation Rajesh Jadwar) यांनी 2020 मध्ये कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हा घोटाळा समोर आला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) गुन्हा (FIR) दाखल करुन अमर मूलचंदाणी यांच्यासह पाच जणांना अटक (Arrest) केली होती.

शुक्रवारी सकाळी ईडीचे (ED Raid In Pimpri Chinchwad) पथक पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले.
पिंपरीतील गणेश हॉटेल, तपोवन मंदिराजवळ मिस्ट्री पॅलेज या इमारतीत अमर मूलचंदानी यांचे निवासस्थान आहे.
याच ठिकाणी ईडीचे अधिकारी सकाळपासून ठाण मांडून होते. कसून तपासणी करण्यात आली.
याशिवाय मुलचंदानी यांचे जयहिंद महाविद्यालयासमोरील कार्य़ालय आहे.
येथेही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सायंकाळी चारपर्यंत माजी संचालकांच्या घर आणि कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.
याशिवाय इतर संचालकांच्या निवासस्थानीही पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. (ED Raid In Pune)

 

Web Title :- ED Raid On Vinay Aranha | ED raids bungalow and office of Vinay Arana, director of renowned Rosary School in Pune, ED conducts thorough investigation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Bypoll Elections | भाजपतर्फे कसब्यातून शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर

Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये 7 पिस्टल व 9 जिवंत काडतुसे जप्त

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘आजच्या घडीला संजय राऊत राजकारणातील जोकर’ – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट