PMC बँक घोटाळा प्रकरणी ED ची धाड; आ. हितेंद्र ठाकूरांचा विवा ग्रुप ‘रडार’वर

पोलिसनामा ऑनलाईन – पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाच ठिकाणी धाडी टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे. वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे.

आगामी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या निमित्ताने ही कारवाई केली असल्याचीही चर्चा सुरू आहे. ईडीने या प्रकरणी या भागातील प्रसिद्ध विवा ग्रुपच्या विविध कार्यालयांमध्ये छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. अद्यापही ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा हा विवा ग्रुप आहे. त्यामुळे या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.