ED Raids On Sanjay Raut | HM अमित शहा-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट; सकाळी संजय राऊतांवर धाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Raids On Sanjay Raut | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज सकाळी सातच्या सुमारास ईडीने धाड टाकून शोधमोहिम आणि चौकशी केली. या कारवाईपूर्वी काही तास अगोदर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अचानक मध्यरात्री दिल्लीला गेले. तिथे विमानतळावरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) आणि शिंदे यांच्यात गुप्त चर्चा झाली. ही चर्चा आटोपून शिंदे पहाटे महाराष्ट्रात परतले आणि सकाळी राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. या सर्व घटनाक्रमाकडे संशयाने पाहिले जात असून चर्चांना उधाण आले आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीत कोणता राजकीय कट शिजला असावा, का याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सकाळीच राऊतांवर झालेली ईडी कारवाई हा निव्वळ योगायोग होता की आणखी काही, याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत. (ED Raids On Sanjay Raut)

 

मुख्यमंत्री शिंदे दिल्लीतून औरंगाबादमध्ये दाखल होताच, ईडीच्या 10 अधिकार्‍यांचे पथक रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर पोहचले.
यावेळी त्यांच्यासोबत सीआरपीएफच्या जवानांचा मोठा बंदोबस्त होता.
आज दिवसभर संजय राऊत यांची चौकशी सुरु होती. सायंकाळी ईडीने खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले.

ईडीच्या अधिकार्‍यांना संजय राऊत यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची माहिती आहे.
त्यामुळे ईडीचे अधिकारी पुढील चौकशीसाठी राऊत यांना बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात नेऊ शकतात.
दरम्यान, ईडीचे दिल्लीतील केंद्रीय अधिकारी हे मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात आहेत.

 

या पार्श्वभूमीवर सध्या ईडीच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवला जात आहे.
ईडीच्या कार्यालयाकडे येणारे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

 

Web Title : – ED Raids On Sanjay Raut | cm eknath shinde meets amit shah in delhi then ed raids on shivsena mp sanjay raut house

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा