पुण्यासह राज्यभरात वॅरॉन ग्रुपच्या कार्यालये, संचालकांच्या घरांवर ईडीचे छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सक्त वसूली संचलनालयाने (ईडी) वॅरॉन ग्रुपच्या पुणे, रत्नागिरी, सांगली, नागपूर येथे छापे टाकले असून तेथे झाडाझडती घेतली आहे. वॅरॉन ग्रुपच्या कंपन्यांचे संचालक यांची कार्यालये, घर आणि फॅक्टरी येथे छापे टाकून त्यांची तपासणी केली आहे. बनावट लेटर ऑफ क्रेडीट देऊन बँक ऑफ इंडीयाची फसवणूक केल्याप्रकरणी इडलीकडून ही चौकशी करण्यात येत आहे.

बँक ऑफ इंडीयाच्या पुणे विभागीय कार्यालयाने वॅरॉन अल्यूमिनियम प्रा. लि. आणि वॅरॉन ऑटो कंपनी प्रा. लिमिटेड आणि इतर कंपन्या यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकार ?
या तक्रारीनुसार वॅरॉन अल्यूमिनियम प्रा, लि. कंपनीच्या कर्वे रोड शाखेत चालू खाते आहे. हे खाते कंपनीचे संचालक श्रीकांत पांडूरंग सवाईकर हे खाते चालवतात. तर कंपनीने सादर बँक ऑफ इंडीयाच्या शाखेत कॅनरा बँकेच्या डेक्कन जीमखाना शाखेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले लेटर ऑफ क्रेडीट आणि बिले जमा केली. त्याची पडताळणी करून बँक ऑफ इंडीयाने केलेलेच लेटर ऑफ क्रेडीट कॅनरा बँकेच्या डेक्कन जीमखाना शाखेत दाखल केले.

त्यानंतर कॅनरा बँकेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी बँक ऑफ इंडीयाने दिलेल्या बिलांची व पडताळणी केली. त्यानंतर बँक ऑफ इंडीयाने हे लेटर ऑफ क्रेडीट स्विकार करत कंपनीला २९३ कोटी रुपये दिले. मात्र जेव्हा या क्रेडीट रकमेची परतफेड केली नसल्याने बँक ऑफ इंडीयाने कॅनरा बँकेकडे याची मागणी केली. तेव्हा कॅनरा बँकेकडून सांगण्यात आले की, बँकेकडून अशी बिलं किंवा लेटर ऑफ क्रेडीट देण्यात आलेले नाहीत. तसेच बँक ऑफ इंडीयाची कोणतीही बिलं कॅनरा बँकेच्या स्ट्रक्चर्ड फायनान्स मेसेजींग सिस्टीने स्विकारले नाहीत. किंवा ते मंजूर केले नाहीत. त्यामुळे ते याची परतफेड करू शकत नाहीत. असे सांगितले.

त्यानंतर बँक ऑफ इंडीयाकडून याची तक्रार इडी कडे केली. इडीने याची दखल घेत तपासाला सुरुवात केली तेव्हा कंपनीचे संचालक श्रीकांत सवाईकर यांनी कॅनरा बँकेतील अधिकारी, व इतर खासगी व्यक्तींशी संगनमत करून बँक ऑफ इंडीयाची फसवणूक केली आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉंडरिंग अक्ट नुसार कारवाई करत तपास करण्यात आला.

त्यावेळी चौकशीनंतर बँकेकडून देण्यात आलेली २९३ कोटी रुपयांची रक्कम ही कंपनीने वेगवेगळ्या खात्यात वर्ग करत जुनी कर्ज फेडण्यासाठी आणि फिक्स्ड डिपॉजिट करण्यासाठी वापरली असल्याचे समोर आले आहे.