मौलाना सादचे पाय आणखी ‘गोत्यात’ ! आता ED नं मनी लॉन्ड्रिंग केल्याचा दाखल केला FIR

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – दिल्लीसह संपूर्ण देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यास जबाबदार असलेल्या तबलिगी जमातमधील लोकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तबलिगी जमातमधील लोकांमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली. सहारनपुरच्या मंडी पोलिसांनी तबलीगी जमातचा प्रमुख साद याचे दोन नातेवाईक मौलाना साजित आणि रशिद यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ED नं मौलाना साद आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग FIR दाखल केला असल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

हे सर्वज आफ्रिकेतून निझामुद्दीन येथे आले होते. तेथून ते सहारनपुला आले होते. या सर्वांनी परदेशातून भारतात आल्याची माहिती लपवून ठेवल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. साजित आणि रशिद यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट दोन दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आला आहे.

उत्तर प्रदेशात कोरना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेशात  कोरोना व्हायरसच्या संक्रमीत रुग्णांची संख्या 748 पर्यंत पोहचली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार 21 नवीन रुग्ण आढळून आले असून त्यांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. यामध्ये 1 जण उन्नाव येथील आहे तर 19 आग्रा येथील आहेत.

तबलीगी जमातशी संबंधित 500 जण
उत्तर प्रदेशात आढळून आलेले कोरोनाबाधित रुग्णांपैकी 500 हून अधिक जण तबलीगी जमात किंवा त्यांच्या संपर्कात आलेले लोक आहेत. उत्तर प्रदेशातील 44 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा फैलाव झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

परदेशी लोकांना लूकआउट नोटीस
उत्तर प्रदेश सरकारने तबलीगी जमातशी संबंधित परदेशी लोकांविरोधात लुकआउट नोटीस बजावली आहे. त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. जेणेकरून ते पुन्हा भारतात येऊ शकणार नाहीत. हे परदेशी तबलीगी लोक असून ते राज्यातील वेगवेगळ्या मशिदींमध्ये जाऊन अनेकांना भेटले होते. त्यांच्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला. तबलीगी जमातशी संबंधित 23 परदेशी लोकांची ओळख पटली आहे. 23 पैकी 17 लोक बांगलादेश, 2 कझाकिस्तान, 2 किर्गिस्तानमधील आहेत. या सर्वांविरोधात उत्तर प्रदेश सरकारने अहवाल तयार करून पाठविला आहे. ED नं मौलाना साद आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग FIR दाखल केला असल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.