SSR Case : रिया चक्रर्वतीवर ED ची मोठी कारवाई ! भाऊ आणि वडिलांसह तिघांचा फोन जप्त

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मनी लॉन्ड्रींगबाबत चौकशी करत असलेल्या ईडीने रिया चक्रवर्तीवर मोठी कारवाई केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर कठोर कारवाई करत ईडीने त्यांचे फोन जप्त केले आहेत. ईडीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजित या तिघांचे फोन जप्त केले आहेत. सोमवारी ईडीने या तिघांची बराच वेळ चौकशी केली होती. पण ईडीला त्यांचे म्हणणे समाधानकारक वाटले नाही, त्यांचे एकमेकांशी सहकार्यही होत नव्हते. अशात ईडीने पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून फोन जप्त केले आहेत.

ईडीला दिला रियाने आपला चार वर्षांचा आयटीआर
रिया चक्रवर्तीने अंमलबजावणी संचालनालयाला आपला आयटीआर दिला आहे. बातमीनुसार, २०१७-१८ मध्ये रिया चक्रवर्तीने आयटीआरमध्ये १८.७५ लाख आणि २०१८-१९ मध्ये १८.२३ लाखांचे उत्पन्न दाखवले आहे. असे म्हटले जात आहे की, रियाने या वर्षांत जितकी कमाई केली तितकी दाखवलीच नाही. त्याचबरोबर ईडीने केलेल्या चौकशीत रियाने मुंबईत तिचे दोन फ्लॅट असल्याचे सांगितले आहे.

वर्ष २०१८ मध्ये तिने मुंबईच्या खार येथे ८० लाख रुपयांहून अधिक किंमतीचा फ्लॅट खरेदी केला होता. यापूर्वी २०१२ मध्ये रिया चक्रवर्तीने तिच्या वडिलांच्या नावावर ६० लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. बातमीनुसार, रियाचे वार्षिक उत्पन्न १५ ते २० लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत रियाने कोट्यवधींची संपत्ती कशी बनवली हा प्रश्न उपस्थित होतो.

शौविकची मोठी चौकशी
आतापर्यंत शौविकची २२ तास चौकशी केली गेली आहे. रात्रभर चौकशीनंतर शौविक रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडला होता. शनिवारी दुपारच्या सुमारास त्याची चौकशी सुरू झाली होती. शुक्रवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया (वय २८) ची सुमारे आठ तास चौकशी झाली होती. शुक्रवारी ईडीने रियाच्या चार्टर्ड अकाउंटंट मोदीचीही चौकशी केली होती. अधिकारऱ्यांनी सांगितले की, ईडीची चौकशी रियाचे उत्पन्न, गुंतवणूक, व्यवसाय आणि व्यावसायिक करारावर केंद्रित होती. ईडीचे लक्ष खार परिसर आणि नवी मुंबईतील रियाशी संबंधित मालमत्तेकडे, तिच्या खरेदी स्रोतांवर आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like