नीरव मोदीला हादरा ; मुंबईसह चार देशांमधील ६३७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा प्रमुख आरोपी आणि हिरे  व्यापारी नीरव मोदीविरुद्ध भारतासह चार देशांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेला सुमारे  ११ हजार ५०० कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीला सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला. ईडीने नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांची ६३७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता, दागिने आणि बँक खात्यांचा समावेश आहे. भारतासह हाँगकाँग, अमेरिका, ब्रिटन आणि स्वित्झर्लंड या चार देशांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5665695c-c542-11e8-bc9c-8d3339952882′]

प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत ईडीने नीरव मोदीची अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील स्थावर संपत्ती जप्त केली तसेच  २२. ६९ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिनेही परत आणले जाणार आहेत.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी, त्याची अमेरिकी पत्नी अमी मोदी, बेल्जियन नागरिक असलेला भाऊ निशाल मोदी व मामा मेहुल चोकसी यांच्यासह अन्य कर्मचारी व बँकेचे अधिकारी आरोपी आहेत. मुंबईतील सीबीआय न्यायालयात नीरव मोदी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून काही महिन्यांपूर्वी सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.

[amazon_link asins=’B078124279,B0756RF9KY,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’618f3a65-c542-11e8-89bd-a51071d03032′]

काय आहे प्रकरण ?
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत  ११ हजार ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला होता . घोटाळ्यातीळ प्रमुख आरोपी   व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाला.   घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सूत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू केली होती.