ED Summons Congress Chief Sonia Gandhi, Rahul In Money Laundering Case | ‘या’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचं समन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ED Summons Congress Chief Sonia Gandhi, Rahul In Money Laundering Case | गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि अन्य काही पक्षातील नेत्यांच्या मागे विविध प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालय (ED) म्हणजेच ईडीचा ससेमिरा लागला आहे. यावरुन केंद्रात सत्ता असणा-या भाजप सरकार (BJP Government) आणि विरोधकात सातत्याने राजकीय शीतयुद्ध रंगताना पाहायला मिळते. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) ईडीने समन्स बजावले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) गांधींना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. (ED Summons Congress Chief Sonia Gandhi, Rahul In Money Laundering Case)

 

समन्स बजावण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) आणि रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद दिली. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे. दरम्यान, ‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र 2008 साली बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने 2010 साली ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्डला 90 कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते फक्त 50 लाखांमध्ये खरेदी केल्याचा आरोप 2013 साली भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (BJP Leader Subramaniam Swamy) यांनी केला होता.

दरम्यान, यंग इंडिया कंपनीचे (Young India Company) प्रत्येकी 38 टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि
राहुल गांधी यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे.
या दरम्यान, या दोघांना 8 जून 2022 रोजी चौकशीसाठी ईडीने बोलावलं आहे.
या प्रकरणाची फाईल ईडीने 2015 साली बंद केली होती. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांनाही समन्स बजावण्यात आला आहे.

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा