SSR Death : उद्या ED कडून रियाची चौकशी, अभिनेत्रीच्या CAला देखील ED चे समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या घटनेला जवळपास दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. या कालावधीत बऱ्याच घडामोडी घडल्या. या प्रकरणाचा तपास सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) समन्स बजावून उद्या (शुक्रवार 7 ऑगस्ट) चौकशी करता बोलाणवण्यात आले आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये ही चौकशी होणार आहे.

रिया चक्रवर्ती हिच्यासह तिचे सीए रितेश शाहची देखील ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी रितेशला समन्स बजावण्यात आले होते. मात्र, तो चौकशीला सामोरे गेला नव्हता. त्याआधी रियाचा जवळचा मित्र ज्याचे बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये नाव आहे, त्या सॅम्युअल मिरांडाची देखील ईडीने चौकशी केली होती. तर सुशांत सिंह राजपूतचा सीए संदीप श्रीधरची देखील ईडीने चौकशी केली आहे. श्रीधरच्या चौकशीनंतर रियाला समन्स बजावण्यात आले. सुशांतचे आर्थिक व्यवहार आणि त्याने संस्थापित केलेल्या कंपन्यांसंदर्भात श्रीधरची चौकशी करण्यात आली होती.

रियाच्या दोन मालमत्तांविषयी ईडीने प्रश्न उपस्थित केले आहेत. शुक्रवारी (दि.7) रियाला मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुशांत आणि रिया यांनी एकत्रितपणे काही कंपन्या आणि मालमत्ता विकत घेतल्या होत्या. यामध्ये रियापेक्षा सुशांतचे पैसे जास्त होते, असे आरोप आहेत. ईडीने नेमक्या कोणत्या मालमत्तेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, रियाच्या संपत्तीचा आणि तिच्या मालमत्तेचा स्पष्ट हिशोब नसल्याचे यावरून उघड झाले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like