ED Summons To Shivsena MP Bhavana Gawali | मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीचे समन्स; पुढील आठवड्यात चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Summons To Shivsena MP Bhavana Gawali | महिला उत्कर्ष मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी (Money Laundering Case) शिवसेनेच्या (Shivsena) खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स (ED Summons) बजावले आहे. या समन्समध्ये पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या पूर्वीही ईडीने (ED) भावना गवळी (Bhavana Gawali) यांना समन्स बजावले होते. मात्र वेगवेगळ्या कारणांनी त्या उपस्थित राहिल्या नाहीत. परंतु त्यांना आता चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. तसे न झाल्यास ईडी त्यांना अजामीनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे. (ED Summons To Shivsena MP Bhavana Gawali)

भावना गवळी यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला होता. गवळींनी भारत सरकारच्या बँकेकडून आपल्या बालाजी आर्टिकल फोर्ट (Balaji Article Fort) कारखाण्यासाठी ४४ कोटींचे कर्ज घेतले होते. तर ११ कोटी कर्ज स्टेट बँकेकडून घेतले. दरम्यान, हा ५५ कोटींचा कारखाना केवळ २५ लाख रुपयांना आपल्याच भावना अँग्रो प्रायव्हेट कंपनीला (Bhavna Agro Private Company) विकला. त्यानंतर या नवीन कंपनीसाठी आणखी ११ कोटी रुपयांचा कर्ज घेतले. अशा प्रकारे भावना गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला होता.

 

काय आहे प्रकरण ?

 

भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी (Pundalikrao Gawli) यांनी १९९२ मध्ये बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची (Balaji Particle Board Factory) स्थापना केली होती. राज्य सरकारच्या (Maharastra Government) हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमकडून ४३ कोटीचे कर्ज मिळविले. २००२मध्ये गवळी यांनी या कारखान्याची १४ हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार हरीश सारडा यांनी ईडीला दिली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.

Web Title :  Shivsena MP bhavana gawali again ordered to appear for questioning next week in Money Laundering Case ED Summons

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI