home page top 1

काय सांगता ! मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून 3 चिंपाझी अन् 4 माकडं ताब्यात

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीची अजब कारवाई , ३ चिंपांझी, ४ मरमोसेट माकडांना घेतले ताब्यात

कोलकाता : वृत्तसंस्था – अंमलबजावणी संचनालनालयाने(ईडी) मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांवरांवर कारवाई केली आहे. परंतु ईडीने आता कारवाई करत चक्क तीन चिंपांझी आणि चार मरमोसेट जातीच्या माकडांवर कारवाई केली आहे. अश्या प्रकाची हि पहिलीच कारवाई आहे. दरम्यान हे सर्व प्रकरण वन्य प्राणांच्या तस्करी संदर्भातील आहे.

याप्रकरणी सुप्रदीप गुहा यांच्यावर कोलकता पोलिसांनी कारवाई करत न्यायालयात खटला दाखल केला आहे. पाळण्यास बंदी असलेल्या वन्य प्राणांची तस्करी केल्याचा आरोप सुप्रदीप यांच्यावर ठेवला आहे. तसेच वन आणि वन्य प्राणी विभागानेदेखील त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, गुहा यांनी खोटी कागदपत्रे सादर करून पशु-पक्षांची तस्करी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार, गुहा हे सराईत तस्कर असून खोटी कागदपत्रे सादर करत कस्टम आणि वन्य जीव विभागाची फसवणूक करत गुहा यांनी वन्य प्राण्यांची तसेच पशु पक्षांची तस्करी केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच त्याच्या जवळ असलेले चिंपांझी हे भारतीय आहेत, असे देखील खोटी कागदपत्रे त्यांनी दाखवली असून कस्टम आणि वन्य विभागाला वेगवेगळी कागदपत्रे दाखवल्याचीही माहिती समोर आली आहे. जनावरांची तस्करी करत गुहा पैसे कमावत असे.

याचप्रकरणी कारवाई करत ईडीने तीन चिंपांझी आणि चार मरमोसेट जातीच्या माकडांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या माकडांची किंमत तब्बल ८१ लाख इतकी आहे. त्यात एका चिपांझीची किंमत २५ लाख तर मरमोसेट माकडाची किंमत दीड लाख रुपये आहे. सध्या या प्राण्यांना देखभालीसाठी अलिपोर येथील प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहे.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like