येडियुरप्पा घेणार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ

कर्नाटक: वृत्तसंस्था

कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला आमंत्रण पाठवले असून, उद्या सकाळी 9.30 वाजता भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांचा शपथविधी होणार असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुणालाही बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. पण काँग्रेस आणि जेडीएसने युती करून सत्ता स्थापनेसाठी त्यांनी राज्यपाल गजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावाही केला. तर येडियुरप्पा यांनी मात्र सत्ता आम्हीच स्थापन करणार असा दावा केला. आज दोन वेळा येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतली. तर कुमारस्वामींनीही संध्याकाळी भेट घेऊन आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर केले होते.

पण, रात्री राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेसाठी पहिलं निमंत्रण मिळाले असून . कर्नाटक भाजपकडून याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे सकाळी 9.30 वाजता येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान , काँग्रेस पक्षाने मात्र राज्यपाल यांच्यावर आरोप केला असून हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.