जुलैमध्ये लॉन्च होणार सरकारची ‘ही’ स्कीम, तुमच्याकडं लाखो रूपये कमवण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत ईटीएफ बाँड जुलैमध्ये येणार करणार आहे. म्युच्युअल फंडासहित बऱ्याच गुंतवणूकदारांना ईटीएफ बद्दल फारसे समजत नाहीत. ईटीएफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड शेअरच्या एका सेटमध्ये गुंतवणूक करतात. हे सहसा एका विशिष्ट इंडेक्सला ट्रॅक करतात. ईटीएफ म्युच्युअल फंडासारखे असतात. मात्र, या दोघांमध्ये मुख्य फरक हा आहे की ईटीएफ केवळ स्टॉक एक्सचेंजमधूनच खरेदी किंवा विकले जाऊ शकते. ज्याप्रकारे तुम्ही शेअर्स खरेदी करता, त्याच प्रकारे एक्सचेंजच्या ट्रेडिंग तासांमध्ये ईटीएफ देखील खरेदी करू शकता.

एडलवाईस एसेट मॅनेजमेन्टने जुलैमध्ये भारत बॉन्ड ईटीएफचा दुसरा हप्ता लाँच करण्याची घोषणा केली. दुसर्‍या हप्त्यामध्ये नवीन भारत बाँड ईटीएफच्या दोन सिरीज येतील, ज्याची परिपक्वता अनुक्रमे एप्रिल २०२५ आणि एप्रिल २०३१ असेल. ज्या गुंतवणूकदारांचे डिमॅट खाते नाही ते देखील समान परिपक्वतेसह भारत बॉन्ड फंड ऑफ फंड मध्ये गुंतवणूक करू शकतील.

भारत बाँड ईटीएफ प्रोग्रॅम ही डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट द्वारे सुरु केली गेलेली भारत सरकारची एक योजना आहे आणि नंतर एडलवाईस अ‍ॅसेट मॅनेजमेन्टला उत्पादनाच्या डिझाईन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली.

ईटीएफच्या दोन नवीन सिरीजच्या लाँचनंतर, एडलवाईस म्युच्युअल फंडाचे उद्देश बाजारातून १४,००० कोटी रुपये जमा करणे आहे.

एडलवाईस अ‍ॅसेट मॅनेजमेन्टने सांगितले की, या मुद्द्याद्वारे बाजारपेठेच्या मागणीच्या आधारावर ११,००० कोटी रुपये अतिरिक्त जमा करण्याचे लक्ष्य आहे. याद्वारे जमा होणारी रक्कम केवळ ३,००० कोटी रुपये असेल. जर यावेळी गुंतवणूकदारांकडून जास्त प्रतिसाद मिळाल्यास ते वाढवून १४,००० कोटी रुपये केले जाऊ शकते.

टॅक्स कसा लागेल
या बाँड ईटीएफवर डेट म्युच्युअल फंडासारखा टॅक्स लावला जातो. म्हणजेच जर गुंतवणूक तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवली तर इंडेक्सेशन बेनिफिटसह २० टक्के दराने कर भरावा लागतो. तीन वर्षांच्या पर्यायात जवळपास ६.३ टक्के परतावा मिळेल. तर १० वर्षांच्या पर्यायात ७ टक्के व्याज मिळेल.

किती नफा मिळेल
समजा जर तुम्ही भारत बाँड ईटीएफमध्ये एक लाख रुपये गुंतवले, तर त्यावर ७.५८ टक्के दराने परतावा मिळाला, तर १० वर्षांत तुमचे पैसे वाढून २.०७ लाख रुपये होतील. मग यावर तुम्हाला कर म्हणून ७,८३६ रुपये द्यावे लागतील. अशात तुम्हाला १.९९ लाख रुपये मिळतील.

किमान गुंतवणूक किती ?
भारत बॉंड ईटीएफमध्ये कमीतकमी गुंतवणूकदार १ हजार रुपयांची गुंतवणूक करु शकतात. यानंतर १,००० रुपयांच्या मल्टिपल मध्ये गुंतवणूक करू शकता.

यात कोणता एक्झिट लोड असेल ?
ऍलॉटमेंट तारखेपासून ३० दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यापूर्वी गुंतवणूकीवर ०.१०% एक्झिट लोड असेल. मात्र, ३० दिवस पूर्ण झाल्यावर रिडम्प्शन/ स्विच केल्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी यात काय आहे
या ईटीएफच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एडलवाईस एएमसीवर आहे. या फंडासाठी यांनी ‘फंड ऑफ फंड’ देखील लाँच केले आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना सामान्य म्युच्युअल फंडाप्रमाणे गुंतवणूक करण्याची मुभा मिळेल. छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही एफओएफ सुविधा आणि लिक्विडीटीच्या बाबतीत अधिक चांगली आहे.

याची अन्य उत्पादनांशी तुलना केली जाऊ शकते –
भारत बाँड ईटीएफमध्ये २०२३ आणि २०३० मॅच्युरिटी कालावधी आहे. या संदर्भात याची तुलना फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन आणि बँकिंग व पीएसयू फंडांशी करता येते. डेट म्युच्युअल फंडांच्या तुलनेत बाँड ईटीएफची किंमत खूपच कमी आहे.

या कंपन्यांचा सहभाग असेल
बाँड ईटीएफ निफ्टी इंडिया बाँड इंडेक्समध्ये गुंतवणूक करते. यात एक्झिम बँक, एचपीसीएल, हुडको, आयआरएफसी, नाबार्ड, एनएचएआय, एनएचपीसी, एनटीपीसी, पीएफसी, एनपीसीआयएल, पॉवर ग्रिड, आरईसी आणि सिडबीसह एएए रेटेड सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत बाँड ईटीएफच्या पहिल्या टप्प्यात १२,४०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम यशस्वीरित्या जमा केली गेली होती.