Edible Oil Price | सर्वसामान्यांना काहीसा दिलासा ! मोहरी, शेंगदाणा तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Edible Oil Price | देशात महागाईचा भडका उडाला आहे. यात सर्वसामान्य नागरिक अक्षरश: होरपळून जात आहेत. पेट्रोल-डिझेल, सीएनजी, घरगुती, व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ (Petrol Diesel CNG LPG Gas Price Hike) झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान दुसरीकडे एक सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्य तेलाच्या दरात (Edible Oil Price) मात्र सातत्याने घट होताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. दरम्यान, सोयाबीन तेल, सीपीओ, कापूस बियाणं आणि पामोलिन तेलाच्या दरात घसरण होताना दिसत आहे. मोहरी (Mustard Oil) आणि शेंगदाणा (Peanuts) तेल-तेलबियांचे दर (Soybean oil) मात्र स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. (Edible Oil Price)

सोयाबीन वगळता बाजारात इतर कोणत्याही तेलबियांना मागणी नाही. तसेच, शिकागो एक्सचेंजमधील मंदीमुळे सोयाबीन तेलाच्या दरात घसरण झाली आहे. बाजारातील मोहरी आणि भुईमूगाची आवक घटू लागली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. काल (बुधवारी) बाजारात मोहरीची आवक सुमारे 5 लाख पोत्यांवरून घटून साडेचार लाख पोत्यांवर पोहोचली होती. अशी माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे.

मोहरीपासून सध्या मोठ्या प्रमाणावर रिफाईंड तेल तयार केलं जात आहे.
त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये बाजारात मोहरीचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
मोहरीच्या पिकाची पुढची खेप येण्यासाठी आणखी 9 ते 10 महिने लागणार आहेत.
त्यामुळे बाजारात मोहरीचा तुटवडा जाणवू नये, यासाठी सरकारने योग्य वेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

या दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, मलेशिया एक्सचेंज सुमारे अर्धा टक्का खाली होता,
तसेच, शिकागो एक्सचेंजही 1.8 टक्क्यांच्या आसपास होता. परदेशातील बाजारातील घसरणीमुळे सोयाबीन तेल,
कच्चे पामतेल (सीपीओ), कापूस बियाणे आणि पामोलिन तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title : Edible Oil Price | edible oil price mustard oil price down soyabean
oil price down edible oil price in india

 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त