Edible Oil Price | सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! खाद्यतेलाच्या किंमती आणखी स्वस्त होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Edible Oil Price | सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नुकतच मागील महिन्यात खाद्यतेलाच्या दरात (Edible Oil Price) कपात करण्यात आली होती. सध्याही खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किरकोळ बाजारात (Retail Market) खाद्यतेलाच्या किंमती खाली आणण्यासाठी आज (बुधवारी) सरकारची महत्त्वाची बैठक अपेक्षित आहे. या बैठकीमध्ये तेल उत्पादकांसह निर्यातदारांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये सरकार तेल विक्रेत्यांना एमआरपी बदलण्याचे आदेश देईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

 

मागील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) तेलाच्या दरात घसरण झाली आहे. या परिस्थितीमध्ये या तमतरतेचा लाभ जनतेपर्यंत गेला पाहिजे. असा सरकारचा मानस आहे. आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. याआधीही खाद्य तेलाच्या किंमतीत लिटरमागे 10 ते 15 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

 

दरम्यान, काही देशांनी खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता बंदी उठवल्यानंतर हे तेल बाजारात आल्यावर घसरण झालीय.
दुसरीकडे सोयाबीनचे (Soybeans) पीकही बाजारात येणार आहे. यामुळेही किंमती कमी होण्याची अपेक्षा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या दरम्यान, मागील काही दिवसांत शेंगदाणा तेल (Peanut Oil) वगळता पॅकेज केलेल्या खाद्यतेलाच्या किरकोळ किंमती 15-20 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
त्यावेळी त्याची किंमत 150 ते 190 रुपये किलोपर्यंत खाली आली होती. यानंतर आता त्यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Edible Oil Price | edible oil prices important meeting with producer and exporter for price cut modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी ‘कॅब’ने ED कार्यालयात

 

Pune News | पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू