Edible Oil Price Reduced | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Edible Oil Price Reduced | सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या खाद्यतेल कंपन्यांनी (Edible Oil Companies) खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट केली आहे. सूर्यफूल, सोयाबीन, मोहरी आणि पामतेल, यात थेट विक्री दरातही घट (Edible Oil Price Reduced) होणार आहे. 5 रुपये ते 15 रुपयांपर्यंत ही घट असणार आहे. यामुळे महागाईने त्रासलेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.

 

खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी कंपनीने (Mother Dairy Company) मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमतीत साधारण 15 रुपयांपर्यंत घट केली आहे. थेट विक्री दारतही घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या (International Market) किंमतीत घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची (Edible oil Price) पुष्कळ उपलब्धता यामुळे हे दर कमी झालेत. पामतेलाच्या दरातही प्रतिलीटर साधारण 7 ते 8 रुपयांची घट झाली. तसेच, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या किंमतीत प्रतिलीटर 10 ते 15 रुपयांची घट झालीय. तर सोयाबीन तेलाचे दर प्रतिलीटर 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. (Edible Oil Price Reduced)

दरम्यान, फॉर्च्युन कंपनीच्या तेलात देखील लवकरच घट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, जेमिनी तेलाच्या दरातही 15 रुपयांची घट झाली आहे. आणखी 20 रुपये कमी होण्याची शक्यता देखील आहे. सूर्यफूल तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने तेलाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सरकारने खाद्यतेलावरचे आयात शुल्कही (Import Duty) कमी केले आहे. याचा परिणाम तेलाच्या किंमतीत घट झाली आहे.

 

Web Title :- Edible Oil Price Reduced | price reduction in rates of cooking edible oil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा