Edible Oil Prices | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या दरात घट; मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Edible Oil Prices | सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) तेलाचे दर घटल्यामुळे आणि सरकारी हस्तक्षेपामुळे आता किरकोळ बाजारातही (Retail Market) खाद्यतेलाचे दर (Edible Oil Prices) कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या महागाईला काही प्रमाणात आळा बसला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सामान्यांना काही अंशी दिलासा मिळताना दिसत आहे.

 

“जून महिन्याच्या सुरुवातीला देशभरात शेंगदाण्याचे दर वगळता इतर खाद्यतेलांच्या किरकोळ दरात 15 ते 20 रुपयांची घट पाहण्यास मिळाली आहे. सध्या हे दर 150 ते 190 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी हेच दर 200 रुपयांच्या घरात होते.” अशी माहिती खाद्य सचिव सुधांशू पांडे (Sudhanshu Pandey) यांनी दिली. (Edible Oil Prices)

 

दरम्यान, अदानी विल्मर (Adani Wilmar) आणि मदर डेअरी (Mother Dairy) या दोन्ही कंपन्यांकडून त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचे दर मागील आठवड्यातच कमी केले होते. यादरम्यान नवे दर लागू असणारा मालही बाजारात आला. येत्या काळात ग्राहकांना ही उत्पादने मिळू शकतील. अशी माहिती आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दोन सत्रांच धाडसत्र चालवण्यात आली. याचेही तेलाच्या दरावर परिणाम दिसून येत आहेत. तेलाचा काळाबाजार या कारवाईतून उघडकीस झाला होता.

 

दरम्यान, इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतात पीठांचे दरही कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्येच ही घट पाहायला मिळाली.
सरकारने उचललेल्या काही महत्त्वाच्या पावलांमुळेच हे शक्य झालं आहे.
मागील काही दिवसांपासून भारत सरकारकडून गव्हाच्या पीठाच्या दरांवर सरकारचेही लक्ष असल्याची माहिती आहे.

 

Web Title :- Edible Oil Prices | major brands cut down edible oil price modi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा