Edible Oils Price Down | सर्वसामान्यांना दिलासा ! मोहरीचे कच्ची घानी तेल 40 रुपयांनी स्वस्त; सोयाबीन-शेंगदाणा तेलाचे भावही उतरले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Edible Oils Price Down | एकीकडे इंधनाच्या किंमतीत घट होत असतानाच दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरातही (Edible Oils Price Down) घसरण होताना दिसत आहे. परदेशातील बाजारामध्ये खाद्यतेलांच्या दरात तेजी असूनही इंडोनेशियाने निर्यात खुली केल्याने मागील आठवड्यामध्ये देशभरातील तेल आणि (Oilseeds) तेलबिया बाजारात घसरणीचं सत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बाजाराचा आढावा घेतला असता आठवड्याच्या शेवटी मोहरी दादरी तेलाच्या दरात 250 रुपयांची घट झाली आहे. ते 15,050 रुपये प्रति क्विंटलवर बंद झाले. तसेच, मोहरी पक्की घानी आणि कच्च्या घानी तेलाचे दरही प्रत्येकी 40 रुपयांनी घटीसह अनुक्रमे 2,365 व 2,445 रुपये आणि 2,405-2,515 टिन (15 KG) रुपयांवर बंद झाले. सोयाबीनचे धान्य आणि सोयाबीन लूजचे घाऊक दर आठवड्याच्या आढावा अंतर्गत अनुक्रमे 7,025 व 7,125 रुपये आणि 6,725-6825 रुपये प्रति क्विंटल वर बंद झालेय. तसेच, परदेशी बाजारात तेजी असूनही डीओसीच्या मागणीमुळे प्रत्येकी 25 रुपयांनी वाढ झालीय. (Edible Oils Price Down)

सोयाबीन तेल (Soybean Oil) –

सोयाबीन दिल्लीचा (Delhi) घाऊक भाव 400 रुपये, सोयाबीन इंदूर 500 रुपयांनी घसरून 16 हजार रुपये आणि सोयाबीनचा दर 300 रुपयांनी घसरून 15 हजार 250 रुपयांवर बंद झाला आहे.

भुईमुगाचे तेल (Peanut Oil) –

सध्या शेंगदाणा तेल आणि तेलबियांच्या किंमती स्थिर झाल्या आहेत. शेंगदाणा बाजार किंमत 125 रुपयांवर बंद झाला आहे. शेंगदाणे तेल गुजरात 200 रुपयांनी घसरून अनुक्रमे 6,710 व 6,845 रुपये आणि 15,650 रुपये प्रति क्विंटलवर बंद झाले आहे. शेंगदाणा सॉल्व्हंट रिफाइंडचा भावही 25 रुपयांनी घसरून 2,625-2,815 रुपये प्रति टिनवर बंद झाला आहे.

क्रूड पाम तेलाचा (सीपीओ) (Crude Palm Oil (CPO) –

कच्च्या पाम तेलात देखील (CPO) 500 रुपयांची घसरण झाली आहे. तसेच, तेल 14,850 रुपये प्रति क्विंटल, पामोलिन दिल्ली 600 रुपयांनी घसरून 16,350 रुपये आणि पामोलिन कांडला 520 रुपयांनी घसरून 15,200 रुपये प्रति क्विंटलवर बंद झाला आहे, आढावा घेतलेल्या आठवड्यात कपाशी तेलाचा दर 350 रुपयांनी घसरून 15,250 रुपये प्रतिक्विंटलवर बंद झाला आहे.

मोहरी तेल (Mustard oil) –

बाजार सूत्रांच्या माहितीनुसार, सोयाबीन, पामोलिन तेलांच्या किंमती सुमारे 100 डॉलरने कमी झाल्या आहेत, देशातील आयात चढ्या दराने कमी झाली असून देशी तेलाने (सोयाबीन, भुईमूग, बिनोला आणि मोहरी) स्थानिक मागणी पूर्ण केली जातेय. यात सगळ्यात अधिक दबाव मोहरीवर आहे, जो आयात केलेल्या तेलांपेक्षा खूपच स्वस्त झालेय. आयात तेलांची मागणी देखील समप्रमाणात नाही, म्हणून गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात आयात सुमारे 13 टक्क्यांनी कमी झाली आहे.

Web Title : Edible Oils Price Down | mustard kachhi ghani became cheaper by rs 40
soyabean ground nut oil prices also down

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर