Editors Guild Of Pune-Pimpri | पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना, कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Editors Guild Of Pune-Pimpri | डिजीटल मिडिया (Digital Media) सध्या आणि आगामी काळात प्रसार माध्यमांचे मुख्यकाम करणार आहे. समाज माध्यमांवर डिजीटल मिडियाचा सर्वाधिक प्रभाव राहणार असल्यामुळे डिजीटल मिडियाला सध्याच्या काळात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना केली आहे. Editors Guild ची पहिली बैठक नुकतीच पुण्यात पार पडली.

ही बैठक Editors Guild चे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील (संपादक – policenama.com आणि pune.news) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीस mpcnews.in चे संस्थापक संचालक विवेक इनामदार, punekarnews.in चे संपादक मुबारक अन्सारी, Consulting Editor टिकम शेखावत, mypunepulse.com च्या संपादिका रेणुका सुर्यवंशी आणि thescoope.in च्या संपादिका आणि कार्यकारी संचालक अर्चना मोरे उपस्थित होत्या. या बैठकीस काही कारणानिमित्त pcbtoday.in चे संपादक अविनाश चिलेकर आणि पोलीसनामाचे पत्रकार बासित शेख उपस्थित राहु शकले नाहीत. बैठकीमध्ये Editors Guild च्या पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.

डिजीटल मिडियामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना एकत्रित आणण्यासाठी तसेच त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी Editors Guild ही संघटना काम करणार आहे. ही संघटना स्थापन करण्यामागे टिकम शेखावत यांचा मोलाचा वाटा आहे.

Editors Guild ची कार्यकारणी

संस्थापक अध्यक्ष – नितीन पाटील
कार्यकारी अध्यक्ष – मुबारक अन्सारी
सरचिटणीस – टिकम शेखावत
वरिष्ठ उपाध्यक्ष – विवेक इनामदार
वरिष्ठ उपाध्यक्ष – अविनाश चिलेकर
चिटणीस – रेणुका सुर्यवंशी
खजिनदार – अर्चना मोरे
कार्यकारणी सदस्य – बासित शेख

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून सोशल मिडियाचा योग्य वापर, हरवलेली मुलगी तासाभरात आईच्या कुशीत सुखरूप

Uddhav Thackeray On BJP | भाजपाच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचारी नेत्याचं नाव, पण निष्ठावंत गडकरींना टाळलं,
उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 4 लाखांची फसवणूक