नोकरदारांना फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा घेऊ शकता फायदा
नवी दिल्ली : वृत्त संस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या स्वताच्या सबस्क्रायबर्सला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी पेन्शन स्कीम (ईपीएस) शिवाय लाईफ इन्श्युरन्सचा आणखी एक मोठा फायदा देते. ईपीएफचे सर्व सबस्क्रायबर इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, 1976 (ईडीएलआय) अंतर्गत कव्हर होतात. ईडीएलआय स्कीम अंतर्गत प्रत्येक ईपीएफ अकाऊंटवर 7 लाख रुपयांपर्यंतचे फ्री इन्श्युरन्स कव्हर मिळते. या स्कीममध्ये कर्मचार्याला कोणत्याही प्रकारचे योगदान द्यावे लागत नाही.
जर एखाद्या ईपीएफओ मेंबर्सचा कोरोना संकटात मृत्यू झाला तर नॉमिनी लाईफ इन्श्युरन्सच्या रक्कमेवर क्लेम करू शकतो. यापूर्वी याचे लिमिट 6 लाख रुपये होते. मागच्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये याचे लिमिट वाढवून 7 लाख रुपये करण्यात आले.
केव्हा आणि कसा करावा क्लेम ?
या रक्कमेसाठी क्लेम नॉमिनीकडून पीएफ खातेधारकाचा आजाराने, दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर केला जाऊ शकतो. यामध्ये एकरक्कमी पैसे दिले जातात. हा इन्श्युरन्स कव्हर सबस्क्रायबरला फ्री मिळतो. यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाहीत. पीएफ अकाऊंटसोबत ते लिंक होते.
यासाठी इन्श्युरन्स कंपनीला डेथ सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट आणि बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता असते. कोविड-19ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारस क्लेम करू शकतो.
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी एम्प्लॉयरकडे जमा होणार्या फॉर्मसोबत इन्श्युरन्स कव्हरचा फॉर्म-5 आयएफ सुद्धा जमा करा. या फॉर्मची एम्प्लॉयर पडताळणी करतो. यानंतर कव्हरचे पैसे मिळतात.
सध्या ईपीएफमध्ये कर्मचार्याच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम जमा होते. एम्प्लॉयर सुद्धा 12 टक्के जमा करतो परंतु ती दोन भागात जमा होते. कंपनी 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा करते.