ED च्या चाैकशीला विहंग सरनाईक चाैथ्यांदा गैरहजर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक सोमवारी (दि. 30) चाैथ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर (Vihang Sarnaik on Monday (Dec. 30) was absent for the fourth time for ED interrogation) राहिले आहेत. तर दुसरीकडे आ. प्रताप सरनाईक यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपत असल्याने त्यांनाही पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजाविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अमित चांडोळे याला अटक केली. रविवारी न्यायालयाने त्याला 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने त्याच्या वाढीव कोठडीची मागणी केली होती. मात्र योग्य पुरावे सादर करू न शकल्याने त्याच्या वाढीव कोठडीस न्यायालयाने नकार दिला आहे.

You might also like