‘ISRO’ मध्ये 86 जागांसाठी भरती, ‘या’ उमेदवारांसाठी ‘सुवर्ण’ संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला ISRO संधी देत आहे. भारतीय आवकाश संशोधन संस्थेने टेक्निशियन सह इतर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छिुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. 

यात टेक्निशिअन बी, ड्रॉट्समॅन आणि टेक्निकल असिस्टेंट यांची 86 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांना हे अर्ज 13 सप्टेंबरपर्यंत करावे लागतील. 
 
महत्वाची तारीख – 
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 सप्टेंबर 2019 हे आहे.
 
या पदांसाठी भरती प्रक्रिया –
टेक्निशियन बी – 40 पद – 
1. फिटर  – 20 पद
2. इलेक्ट्रिक मेकॅनिकल – 15 पद
3. प्लंबर – 02 पद
4.  वेल्डर – 01 पद
5. मशीनिस्ट – 01
 
ड्रॉट्समॅन बी – 12 पद –
1. ड्रॉट्समॅन मेकॅनिकल – 10 पद
2. ड्रॉट्समॅन इलेक्ट्रिकल – 02 पद
 
टेक्निकल असिस्टेंट – 35 पद 
1. मेकॅनिकल – 20 पद
2. इलेक्ट्रॉिनिक्स – 12 पद
3. सिविल – 03 पद
 
योग्यता  – 
शैक्षणिक योग्यता –
टेक्निशियन बी/ ड्रॉट्समॅन बी –  SSLC/SSC/ 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मधील आटीआय आवश्यक
टेक्निकल असिस्टेंट – संबंधित ट्रेडमध्ये एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीतून डिप्लोमा.
 
वयोमर्यादा –
उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षादरम्यान हवे.( आरक्षण असलेल्या उमेदवारांना नियमानुसार सूट )
 
पे – स्केल – 
टेक्निशियन बी, ड्रॉट्समॅन बी –  पे मॅट्रिक्स लेवल 3 आणि 21,700 रुपये, याशिवाय डीए
टेक्निकल असिस्टेंट – पे मॅट्रिक्स लेवल, 7 आणि 44,900 रुपये आणि डीए
 
असा करा अर्ज –
इच्छुक उमेदवार या पदांसाठी 24 ऑगस्टपासून 13 सप्टेंबर 2019 दरम्यान अर्ज करु शकतात. उमेदवारांना सल्ला दिला जात आहे की अर्जची प्रिंट काढून ठेवण्यात यावी. 
परिक्षा शुल्क –
पुरुष आणि ओबीसी साठी – 250 रुपये
यासाठी उमेदवार isro.gov.in यावर ऑनलाइन अर्ज करु शकतात.