शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर यांची निवड निश्चित

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांना तर उपसभापतीचा शर्मिला बाबर यांची निवड होन्याची शक्यता आहे. आज (गुरुवारी) सभापती आणि उपसभापतीपदासाठी भाजपकडून दोघींचे अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. त्यांच्या निवडीवर सोमवारी (दि.9) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.
[amazon_link asins=’B0746JXMWV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1fdfaf83-8042-11e8-830e-ebaf36e88fda’]
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज (गुरुवारी) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे यांचा सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. सभापती, उपसभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक सोमवारी (दि. 9 जुलै) रोजी दुपारी एक  वाजता पालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

या समितीवर मंडळाप्रमाणे 15 सदस्यसंख्या घटून विविध विषय समितीप्रमाणे 9 नगरसेवकांची ही समिती आहे. त्यामध्ये भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची नुकत्याच झालेल्या महासभेत शिक्षण समितीत निवड करण्यात आली होती.
जाहिरात