शिक्षण सम्राट मारुती नवले यांची रवानगी येरवडा कारागृहात

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केल्याप्रकरणी सात दिवसांच्या साध्या कैदेची तसेच दोन हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आलेले सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांची बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5afb561-d22e-11e8-ad28-1572cc210750′]
नवले यांची ससून रुग्णालयात वैद्याकीय तपासणी करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने बुधवारी  सायंकाळी नवले यांची येरवडा कारागृहात रवानगी केली सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांचे वेतन अनेक महिने थकवल्याप्रकरणी आंदोलने, निवेदने देण्यात आली होती. प्राध्यापकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनानंतरही सिंहगड इन्स्टिट्यूटने दखल घेतली नव्हती. अखेर प्राध्यापकांनी न्यायालयात धाव घेतली होती. प्राध्यापकांचे जवळपास १८ कोटी रुपयांचे थकलेले वेतन तीन टप्प्यांत देण्यात यावे, असे न्यायालयाने आदेश दिले होते.

पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात समाजकल्याण विभागाकडून येणे असलेले साधारण नऊ कोटी रुपये जमा झाले. नवले यांची खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली होती. नऊ  कोटी रुपये काढण्यासाठी न्यायालयाने तोंडी आदेश दिले आहेत, अशा आशयाचे पत्र नवले यांनी बँक आणि प्राप्तिकर खात्याला दिले. त्यानुसार प्राप्तिकर खात्याने पैसे काढण्यास परवानगी दिली. हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने नवले आणि प्राप्तिकर खात्यातील अधिकारी सदाशिव मोकाशी यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान प्रकरणी कारवाई केली होती. नवले यांच्या विरोधात दाखल झालेल्या अवमान याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने नवले यांच्यासह मोकाशी यांना सात दिवसांची साधी कैद आणि २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.