Facebook Fellowship Program 2021 : फेसबुक फेलोशिपसाठी 1 ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज, संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये संशोधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधनासाठी चांगल्या फेलोशिपच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी बातमी आहे. फेसबुक फेलोशिप प्रोग्राम २०२१ साठीची अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२० रोजी संपणार आहे. ज्या उमेदवारांना फेसबुक फेलोशिप २०२१ साठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइट research.fb.com वर जाऊन अर्ज करू शकतात. फेसबुकने एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठात संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकीशी संबंधित नाविन्यपूर्ण विषयांवर संशोधन करणार्‍या पीएचडी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम तयार केला आहे.

फेसबुक फेलोशिप अवॉर्डमध्ये काय मिळणार?

संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी (जास्तीत जास्त दोन वर्षे किंवा ४ सत्र) शिकवणी आणि फी.
राहण्यासाठी आणि कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास खर्चांसाठी वार्षिक ४२,००० यूएस डॉलरचा स्टायपेंड. फेसबुक मुख्यालयात होणाऱ्या वार्षिक ‘फेलोशिप समिट’साठी पेड व्हिजिट.

कोण करू शकतो अर्ज?

फेसबुक फेलोशिप प्रोग्राम २०२१ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेत संगणक शास्त्र किंवा अभियांत्रिकी विषयातील पीएचडी विद्यार्थी असणे आवश्यक आहे आणि फेसबुक फेलोशिप दरम्यान उमेदवारांना पूर्णवेळ पीएचडीमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.

या क्षेत्रात दिली जाईल फेलोशिप

फेसबुक फेलोशिप प्रोग्राम २०२१ अंतर्गत ज्या प्रमुख क्षेत्रात फेलोशिप दिली जाईल, त्यात अप्लाईड स्टॅटिस्टिक्स, एआर/व्हीआर कॉम्प्युटर ग्राफिक्स, एआर/व्हीआर फोटॉनिक्स आणि ऑप्टिक्स, एआर/व्हीआर फ्युचर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटेशनल सोशल सायन्स, कॉम्प्युटर व्हिजन, डेटाबेस सिस्टम, अर्थशास्त्र आणि कॉम्प्युटेशन, मशीन लर्निंग, नेटवर्किंग, सामाजिक आणि आर्थिक धोरण, मशीन लर्निंग इ. समाविष्ट आहे.

असा करा अर्ज

फेसबुक फेलोशिप प्रोग्राम २०२१ साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना research.fb.com/fellowship वर जाऊन अर्ज लिंकवर क्लिक करावे लागेल.