शिक्षणामध्ये राजकारण होतय : सुप्रिया सुळे

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात सरकारने जिल्हा परिषदेच्या १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  “शाळा बंद करण्याबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी खोटी वक्तव्यं केली आहेत. असे विधान शिक्षणमंत्री विनोद तावडे करित आहेत. हे ऐकून अत्यंत दुःख वाटत आहे. आतापर्यंत राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर माननीय शरद पवार आणि मी कधीही खोटे बोललो नाही”. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

याप्रसंगी बोलताना, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या भाजप सरकारने राज्यातील शिक्षण क्षेत्राची अवस्था भीषण करून ठेवली आहे. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. मात्र हे सरकार शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळेच शाळा बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, असे त्यांच्या निर्णयातून स्पष्ट होत आहे.

याबरोबरच, पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा शिक्षणासारख्या महत्वाच्या बाबतीत कधीच राजकारण केले नाही. मात्र हे सरकार शिक्षणात राजकारण आणत आहे. या राजकारणामुळे वाड्या वस्तीवर राहणाऱ्या मुलाचा बळी जात आहे. या सर्व निर्णयाचा खुलासा सरकारने करावा. अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली.