Result 2020 : MSBSHSE ‘या’ तारखेला होऊ शकते HSC आणि SSC परीक्षेच्या निकालांची घोषणा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Maharashtra Board SSC, HSC Result 2020 : राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढत असतानाच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्ड 10वी आणि 12वी इयत्तेच्या परीक्षेच्या निकालांची घोषणा करण्याची तयारी करत आहे. रिझल्ट 15 जुलैपर्यंत घोषित केले जातील. अशात परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांनी बोर्डाची ऑफिशियल वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर लेटेस्ट अपडेट चेक करत राहावे. सध्या बोर्डाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. बोर्डाने स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्याही माहितीसाठी केवळ ऑफिशियल वेबसाइटवर विश्वास ठेवावा.

महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट : केव्हा लागणार 10 वी आणि 12 वीचे निकाल

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी एज्युकेशनने 12वीची परीक्षा लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी घेतली होती. तर 23 मार्चला होणारा 10वीची भूगोलाची परिक्षा होऊ शकली नव्हती. परंतु, नंतर स्थिती लक्षात घेऊन बोर्डाने भूगोलाचा पेपर रद्द केला होता. या सोबतच हे ठरवले की, अन्य विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर याचे गुण दिले जातील. परंतु, उत्तर पत्रिकांची तपासणी सुरू होऊ शकली नव्हती. परंतु, लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच, उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर लेटेस्ट अपडेटनुसार जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात निकाल जाहीर केले जातील.

महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट :

महाराष्ट्र बोर्ड दरवर्षी फेब्रुवारी – मार्च महिन्यात 10वी (एसएससी) आणि 12वी (एचएससी) ची परीक्षा घेते. या वर्षी 13 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे. तर राज्यभरात 17 लाख विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत सहभागी झाले होते. मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे की, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅण्ड हायर एज्युकेशनच्या वरिष्ठ अधिकारी शकुंतला काळे यांच्यानुसार महाराष्ट्र बोर्ड 12वीचे निकाल 15 जुलै आणि 10वीचे निकाल जुलैच्या अखेरपर्यत जाहीर करू शकतो. यशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या बैठकीत सहभाग घेतला होता. सामान्यपणे परीक्षा झाल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर करते. परंतु, यावर्षी कोविड-19 महामारीमुळे केंद्रीय सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास उशीर झाला आहे. परंतु, आता लेटेस्ट अपडेटनुसार उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. लवकरच निकाल जाहीर केले जातील.

काय आहेत मागच्या वर्षीचे आकडे

महाराष्ट्र बोर्डाकडून निकाल कधी जाहीर होत आहेत, याची वाट विद्यार्थी पाहात आहेत. मागच्या वर्षी 2019 मध्ये एमएसबीएसएचएसई 10वी परीक्षा निकालात 77.10 टक्के विद्यार्थी पास झाले होते. मुलींचा निकाल सर्वात चांगला होता. मुली 82.82% आणि मुले 72.18% पास झाले होती. तर महाराष्ट्र बोर्ड 12वीमध्ये 85.88 टक्के विद्यार्थी पास झाले होते. 12वीत सुद्धा मुलींचा निकाल जास्त होता. 90.25 टक्के मुली तर 82.40 टक्के मुले पास झाली होती. 4470 विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुण मिळवले होते. कोकणची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती. तर नागपुरची कामगिरी सर्वात खराब होती. स्ट्रीम वाईज पास टक्केवारी पाहिली तर आर्टसमध्ये 76.45 टक्के, सायन्समध्ये 92.60 टक्के आणि कॉमर्समध्ये 88.28 टक्के विद्यार्थी पास झाले.

महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2020 :

2019 मध्ये 3 एप्रिल 2020 ला महाराष्ट्र एसएससी निकालाची घोषणा झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रात एकुण 17,66,098 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यापैकी 9,89,908 मुले आणि 7,76,190 मुली आहेत. परीक्षेला उपस्थित एकुण 17 लाख विद्यार्थ्यांपैकी 75% विद्यार्थाी 2018 मध्ये 89.41% तुलनेत परीक्षेत पास झाले. महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2020 साठी प्रमुख आकडे खाली दिले आहेत.

हे आकडे पाहा

एकुण विद्यार्थी संख्या : 17,66,098

एकुण विद्यार्थ्यांची संख्या : 9,89,908

एकुण विद्यार्थीनींची संख्या : 7,76,190

एकुण पास : 75%

मुले उत्तीर्ण : 72.18%

मुली उत्तीर्ण : 82.82%

100% टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 20 आहेत.

90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी : 25,941

सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारा जिल्हा

कोंकण – 88.38%

पुणे – 82.48%

नागपुर – 67.27%

औरंगाबाद – 75.20%

मुंबई – 77.04%

महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2020 :

महाराष्ट्र बोर्डाने एसएससीप्रमाणेच मागच्या वर्षी एचएससी परीक्षेचे निकाल देखील त्याच दिवशी जाहीर केले होते. बोर्डाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, एकुण 14,21,936 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होत, ज्यापैकी सुमारे 10.5 लाख विद्यार्थी पास झाले होते.

हे आकडे पाहा

एकुण विद्यार्थ्यांची संख्या : 14,21,936

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकुण संख्या : 10.5 लाख

एकुण पास – 85.88%

मुली – 90.25%

मुले – 82.40%

एकुण उपस्थित विद्यार्थी – 1421936

एकुण उत्तीर्ण- 12,21,169

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा – कोंकण 93.23% पास

महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2020 आणि एचएससी निकाल 2020 : येथे करा चेक

महाराष्ट्र बोर्ड जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करणार आहे. निकाल ऑफिशियल वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी याच वेबसाइटवर निकाल पाहायचा आहे. यासाठी ऑफिशियल वेबसाइटवर लॉगइन केल्यानंतर होमपेजवर रिझल्टची लिंक असेल. आता रिझल्टवर क्लिक करून इयत्ता निवडा. यानंतर समोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे आपला लॉगइन क्रेडेन्शियल म्हणजे रोल नंबर, रोल कोड इत्यादी सबमिट करा. आता तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तो सबमिट केल्यानंतर विद्यार्थी आपले विषयानुसार गुणसुद्धा पाहू शकतात. विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रिंटआऊट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपीसुद्धा सेव करावी.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like