शिक्षणमंत्री आशिष शेलार चांगल्या मतांनी ‘पास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजपचे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आशिष शेलार यांनी आपला गड राखला आहे. शेलार 25 हजार 900 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून कमी मतदान झाले असतानाही आशिष शेलार यांनी विजयाची नोंद केली आहे.

वांद्रे पश्चिम हा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती. मात्र, 2014 च्या निवडणुकीत काँग्रसची सत्ता हिरावून घेत शेलार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसचे आसिफ जकेरिया यांचे कडवे आव्हान होते. भाजपला डोकेदुखी ठरणाऱ्या चाळीस जागांमध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेश होता. तसेच या ठिकाणी बसप आणि वंचित बहुजन आघाडचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर विनोद तावडे यांच्याकडे असलेले शालेय शिक्षण मंत्रीपद शेलार यांच्याकडे देण्यात आले होते. निवडून आल्यावर फडणवीस सरकारच्या नव्या शेलार यांना कोणते मंत्रिपद मिळार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Visit : Policenama.com