राज ठाकरेंच्या ‘स्ट्राईक’ नंतर ‘ते’ फोटो गायब, भाजपचाही पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज ठाकरे यांच्या भाजपविरोधातील सभा सध्या गर्दी खेचत आहेत. ए लाव रे तो व्हिडीओ आणि आणा रे त्याला या वाक्यांनी भाजपच्या गोटात धडकी भरवली असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगलेली आहे. दरम्यान त्यांनी कालच्या सभेत दाखवलेल्या चिले परिवाराचा फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. हा फोटो आता भाजपच्या फेसबुक पेजवरून गायब झाला आहे. मात्र या फोटोवरून भाजपने पलटवार जरूर केला आहे.

राज ठाकरे यांच्या दाव्याची दखल घेत मोदी है तो मूमकिन है चा तो फोटो गायब झाला. मात्र विनोद तावडे यांनी यावरून चांगलेच टिकास्त्र सोडले आहे.हा फोटो भारतीय जनता पक्षाच्या किंवा सरकारच्या अधिकृत जाहिरातीतील नाही. तो कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला नाही. मात्र संबंधित कुटुंबाच्या परवानगीशिवाय फोटो अशा प्रकारे वापरणे चुकीचे आहे असं तावडे म्हणाले.

हा फोटो एखाद्या मोदी प्रेमीने सोशल मिडीयावर पोस्ट केलेला असू शकतो. अशा पद्धतीने फोटो पावरल्याचे आमच्या लक्षात आले. हे चिले कुटुंबातील सदस्यांनीच स्वत:हून सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी काही शोधून काढल्याचा आव आणू नये असे तावडे म्हणाले.