NEET Exam 2020 : ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्यासाठी पालकांनी ‘सर्वोच्च न्यायालयात’ दाखल केली ‘याचिका’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशभरात कोविड -19 च्या साथीच्या आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे मध्य पूर्व देशांमध्ये राहणाऱ्या नीट (NEET) परीक्षा उमेदवारांच्या पालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मध्य पूर्व देशांमध्ये राहणाऱ्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेल्या याचिकेमध्ये सरकारला कोविड -19 च्या दृष्टीने मध्य पूर्व भागांमध्येच परीक्षा केंद्रे स्थापन करण्याची किंवा परीक्षा पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. पालक म्हणतात की सध्याच्या परिस्थितीत ही परीक्षा त्यांच्याच भागांमध्ये घेण्यात यावी, जर हे शक्य नसेल तर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.

याआधी केरळ उच्च न्यायालयातही अशीच याचिका दाखल करण्यात आली होती व ती फेटाळून लावण्यात आली होती. देशातील कोरोनो विषाणूच्या संख्येत झालेल्या वाढीच्या दरम्यान विद्यार्थी बऱ्याच काळापासून जुलैची नीटची परीक्षा तहकूब करण्याची मागणी करत होते.

एमबीबीएस/ बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. नीट परीक्षा 2020 साठी 15 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्याच बरोबर, यापूर्वी इंडिया वाइड पॅरेंट्स असोसिएशनने मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक पत्र लिहून नीट (NEET) आणि जेईई (JEE) मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने प्रवेश परीक्षा का घेऊ नये याविषयी 15 कारणे सूचीबद्ध केली होती.