NEET 2020 : आरोग्य मंत्रालयाकडून नीट यूजी परीक्षेसाठी SOP गाइडलाईन जाहीर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात जेईई मुख्य परीक्षा देशभरात आयोजित करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी नीट यूजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षा आयोजित करण्यासाठी सुधारित प्रमाणित कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जारी केली आहे. या परीक्षा एसओपी अंतर्गत घेण्यात येतील. या तर जाणून घेऊ काय असणार नियमावली.

– परीक्षा केंद्रात दोन विद्यार्थ्यांच्या जागेच्या दरम्यान सहा फूट जागा असणे आवश्यक असेल.

– परीक्षा केंद्रात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीस फेस मास्क किंवा चेहरा झाकणे आवश्यक असेल.

– कंटेनमेंट झोनमधून येणारे परीक्षक आणि कर्मचार्‍यांना केंद्रावर येऊ दिले जाणार नाही.

– केवळ कंटेनमेंट झोनच्या बाहेर तयार केलेल्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेस परवानगी असेल.

– परीक्षा केंद्रात कोठेही थुंकणे प्रतिबंधित आहे.

– परीक्षा केंद्रातील प्रत्येक व्यक्तीच्या फोनवर आरोग्य सेतु अँप असणे आवश्यक आहे.

– प्रत्येक खोलीत आसन योजनेनंतर परीक्षा नियंत्रक सामाजिक अंतराचे नियम तपासेल.

कोविड -19 ची लक्षणं दिसल्यास काय करावे?

एखाद्या व्यक्तीमध्ये तपासणी दरम्यान कोविड -19 ची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीला एखाद्या दुसऱ्या खोलीत किंवा इतर ठिकाणी बसवले जाईल, डॉक्टरांकडून तपासणी होईपर्यंत ती व्यक्ती तोंडावर मास्क लावून दुसऱ्या खोलीत बसलेली असेल.