NAT नं UGC NET 2020 चा फॉर्म भरण्यासाठी अ‍ॅप्लीकेशन विंडो पुन्हा उघडली, जाणून घ्या कधीपर्यंत करू शकता अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट 2020 (CSIR- UGC NET 2020) परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी अ‍ॅप्लीकेशन विंडो पुन्हा उघडली आहे. याअंतर्गत ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेले नाही ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि 10 सप्टेंबरपर्यंत चालेल. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज जमा करण्याची किंवा भरण्याची ही प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असेल तर 10 सप्टेंबर रोजी रात्री 11.50 पर्यंत शुल्क स्वीकारले जाईल. अर्जाचे शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग/ यूपीआय मार्फत ऑनलाईन पद्धतीने भरता येऊ शकते.

एनटीएने या संदर्भात एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की कोविड -19 चा संसर्ग आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकले नाहीत, असे या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हे लक्षात घेता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), एनटीएने काही आठवड्यांसाठी पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत फक्त ते विद्यार्थी अर्ज करू शकतील ज्यांनी इतर कोणत्याही कारणास्तव अर्ज पूर्ण केला नव्हता किंवा सीएसआयआर-यूजीसी नेट जून 2020 मध्ये अर्ज भरला नव्हता. अशा उमेदवारांना त्यांचा अर्ज भरण्याची संधी मिळेल.

11 ते 17 सप्टेंबर पर्यंत करू शकता करेक्शन

11 ते 17 सप्टेंबर दरम्यान एनटीए पुन्हा करेक्शन विंडो ओपन करेल. याअंतर्गत उमेदवारी अर्जात जे काही करेक्शन आहेत त्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. त्यासाठी त्यांना ऑनलाइन जाऊन पुन्हा दुरुस्ती करावी लागेल.