10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर ! DRDO मध्ये नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 56 हजारांपर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट रिसर्च ऑर्गेनाइजेशन (DRDO) मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या पदावर भरती केली जाणार आहे. संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे

पदाचे वर्गीकरण
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या 1817 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता
या पदासाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांची 10 वी उत्तीर्ण केलेली आहे.

काय आहे आवेदन शुल्क
जनरल/ओबीसी/ EWS कॅटगरी च्या लोकांसाठी 100 रुपये आणि SC/ST कॅटगरीच्या उमेदवारांसाठी कोणताहि शुल्क सांगण्यात आलेला नाही.

वयोमर्यादा
कमीतकमी वय 18 आणि जास्तीत जास्त वय 20 वर्षांपर्यंत निर्धारित करण्यात आलेले आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आलेली आहे. ज्यासाठी नोटिफिकेशन पहावे लागेल.

महत्वाच्या तारखा
अर्ज जमा करण्याची तारीक – 23 डिसेंबर 2019
अर्ज जमा करण्याची शेवटची तारीक – 23 जानेवारी 2020

कसा करायचा अर्ज
ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी अधिकृत वेबसाइटवरून अधिकची माहिती मिळवू शकता, drdo.gov.in

कशी होणार निवड
उमेदवारांची निवड ही कंप्यूटर बेस्ट परीक्षा (स्क्रीनिंग) आणि टियर 2 (फाइनल टेस्ट) च्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/