महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनवली जगभरात आजारांची माहिती देणारी वेबसाईट

देहराडून : पोलीसनामा ऑनलाइन  –  आपल्या आजुबाजूला असलेले लोक कोरोनाविषयीच्या अफवांवर सहज विश्वास ठेवतात. तसेच ऐकीव माहिती त्यांना खरी वाटते त्यामुळे ते चुकीच्या मार्गावर जातात. हे पाहून देहराडूनमध्ये MCA च्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मयंक जोशी आणिअतुल रावत या दोन विद्यार्थ्यांनी www.medinalys.com ही वेबसाईट तयार केली आहे. हे दोघे सध्या इंटर्नशीप करत होते पण लॉकडाउनमुळे ते घरातच अडकून पडले.

कोरोनाबरोबरच जगातील आलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या महामारींबद्दल योग्य आणि खरी माहिती लोकांना देणे हा या वेबसाइटच्या मागचा उद्देश आहे. या दोघांनीही त्यासाठी ऑनलाइन संशोधन करून योग्य ती माहिती गोळा केली आणि ती या वेबसाइटवर दिली आहे. त्यामुळे कोरोनाविषयी काहीही शंका मनात आल्यास त्याची सत्यता पडताळण्यासाठी लोक या वेबसाइटचा वापर करू शकतात.