दिग्दर्शक म्हणाला, ‘कपडे काढ अन्…’; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी अनेकांकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी खूप मोठा संघर्षही करावा लागतो. काहींना त्यात यश मिळते तर काहींना काही केल्या यश मिळत नाही. बहुतांश अभिनेत्रींना कास्टिंग काउचसारख्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशाचप्रकारचा सामना अभिनेत्री ईशा अग्रवाल हिने केल्याचा खुलासा तिने स्वत: केला आहे.

ईशा अग्रवाल हिला कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. त्यावर बोलताना ती म्हणाली, ‘कास्टिंग काउच प्रत्यक्षात होत असत. कारण जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा एका नावाजलेल्या कास्टिंग डायरेक्टरने मला ऑफिसमध्ये बोलावले. मी माझ्या बहिणीसोबत तिथे गेले. त्याने आजवर अनेक मोठ्या सेलिब्रिटींना कास्ट केल्याचा दावा करत मलाही मोठा प्रोजेक्ट मिळवून देण्याचे आश्वासन दिले’. तसेच ‘भूमिकेबद्दल आमची चर्चा सुरु असतानाच त्या दिग्दर्शकाने अचानक मला माझे सगळे कपडे काढायला सांगितले. जेणेकरून तो माझी फिगर पाहू शकेल. भूमिकेसाठी त्याला माझी फिगर पाहणे गरजेचे असल्याचे तो म्हणाला. लगेचच मी बहिणीसोबत त्याच्या ऑफिसमधून निघून गेले. त्यानंतर बरेच दिवस तो मला मेसेज करत होता. अखेर मी त्याला ब्लॉक केले, असे ईशाने सांगितले.

अभिनेत्री ईशा अग्रवाल हिने ‘कहीं है मेरा प्यार’, ‘थित्तिवसल’ या तमिळ सिनेमातही काम केले. ‘कहीं है मेरा प्यार’ या सिनेमात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि संजय कपूर यांच्यासोबत काम केले आहे.

अशांपासून सावध…

या क्षेत्रात तुम्हाला मोठं काम किंवा मोठे प्रोजेक्ट मिळवून देतो, असे सांगणारे अनेकजण मिळतील. जे तुम्हाला भुरळ घालून फसवण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून सावध रहा, असे ईशाने सांगितले आहे.