10 बँकांचं ‘विलनीकरण’ झालं, आता खातेधारकांच्या ‘खात्याचे’ आणि ‘पैशांचे’ काय होणार ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या बँकिंग व्यवस्थेत बदल करण्याचा घोषणेनंतर देशभरातील तब्बल 10 सरकारी बँकांचे विलनीकरण करण्यात आले. या बँक विलनीकरणानंतर आता बँकांच्या अनेक शाखा बंद होतील आणि नव्या शाखा सुरु होतील. परंतू बँकांच्या विलनीकरणचा थोडा परिणाम ग्राहकांच्या व्यवहारावर पडणार आहे. या निर्णयानंतर ग्राहकांना काही कामे पूर्ण करावे लागतील. सरकारी बँकांची संख्या २०१७ सालच्या २७ वरून कमी होऊन आता 12 शिल्लक राहिली आहे. देशाची अर्थव्यवस्थेचा विचार करता याचा चांगला परिणाम होईल असे मानले जात आहे.
ग्राहकांवर काय होणार परिणाम
1. ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि कस्टमर आयडी देण्यात येईल.
2. ज्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक किंवा IFSC कोड मिळेल त्यांना नवीन माहिती आयकर विभागाला, विमा कंपन्यांना, म्युचूअल फंड, पेंशन योजना या अपडेटसाठी द्यावी लागेल.
3. SIP किंवा कर्जाच्या EMI साठी ग्राहकांना नवीन इंस्ट्रकशन फॉर्म भरुन द्यावा लागेल.
4. नवीन चेक बूक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड घ्यावे लागतील.
5. FD आणि RD वर मिळणाऱ्या व्याजात कोणतेही बदल होणार नाहीत.
6. ज्यांनी वाहन कर्ज, गृह कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असल्यास त्यांच्या व्याजदरात कोणतेही बदल होणार नाहीत.
7. काही शाखा बंद होतील, यासाठी ग्राहकांना नव्या शाखेत जावे लागेल.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर
- ‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती
- रक्ताचा रंग लालच का असतो ? जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी
- दारू पिल्यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात ? जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर