1500 ची ‘घरसण’ झाल्यानं सोनं 41670 रूपये प्रति 10 ग्रॅम, 1395 ची ‘घट’ होऊन चांदी 42460 रूपये प्रति किलोग्रॅमवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा संसर्ग जगातील 120 पेक्षा जास्त देशात पसरल्याने अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळ किमती धातुंमध्ये सुरू असलेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम शनिवारी स्थानिक बाजारावर दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात सोने 1,500 रुपयांनी घटून 41,670 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले. तर चांदी 1,395 रुपयांनी घसरून 42,460 रुपये प्रति किलोग्रामवर आली.

परदेशांमध्ये शुक्रवारी सप्ताहाच्या शेवटी धातुंच्या किमतींवर मोठा दबाव दिसून आला. लंडन आणि न्यूयार्कमधून मिळालेल्या माहितीनुसार सप्ताहाच्या शेवटी सोने मोठ्या घसरणीनंतर 1529.05 डॉलर प्रति औंसवर राहिले. एप्रिलचा अमेरिकन सोने वायदा बाजार 71.50 डॉलर घटून 1,517.80 डॉलर प्रति औंसवर आला. अंतरराष्ट्रीय बाजारात चांदी सुमारे एक डॉलरने घसरून 14.72 डॉलर प्रति औंसवर आली.