मंदीचा फटका ! ‘मारुती’ने घेतला ‘हा ‘ निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकीला मंदीचा जबरदस्त फटका बसला असून कंपनीने गुरुग्राम आणि मनेसर प्रकल्पामधील उत्पादन दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ७ आणि ९ सप्टेंबरला उत्पादन प्रकल्पातील काम बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून या दिवशी कोणतेही उत्पादन घेतले जाणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ३३ टक्के घट झाली आहे. त्यामुळे सलग सात महिने कंपनीने उत्पादन घटविले आहे. मारुतीने ऑगस्टमध्ये ३३.९९ टक्के उत्पादन घटविले आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये १ लाख ११ हजार ३७० वाहनांचे उत्पादन घेतले. गतवर्षी कंपनीने ऑगस्टमध्ये १ लाख ६८ हजार ७२५ वाहनांचे उत्पादन घेतले होते. जुलैमध्ये प्रवासी वाहनांचे १ लाख १० हजार २१४ वाहनांचे उत्पादन घेतले होते. प्रवासी वाहनांच्या विक्रीत २५.१५ टक्के घट झाली आहे.परिणामी वाहन उद्योगावर कामगार कपातीची तलवार अटळ असल्याचे चित्र आहे.

आरोग्यविषयक वृत्त –