ट्रम्प यांच्या एका शब्दाने जगाचं ९० हजार कोटींचं नुकसान !

वाॅशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिका जागतिक महासत्ता असल्याने त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे जगाचे लक्ष लागून असते. त्या निर्णयाचे परिणाम हे जगातील अर्थव्यवस्थेवर पडत असतात . अशाच प्रकारची एक घटना पुन्हा घडली आहे . मात्र यावेळेस घटना थोडी वेगळी आहे . या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनेही हे पुन्हा अधोरेखित केले.

ट्रम्प यांनी ट्विट केल्यानंतर जागतिक बाजाराचे जवळजवळ १. ३६ लाख कोटी डॉलर बुडाले. ट्रम्प यांच्या या ट्विटमध्ये केवळ १०२ शब्द होते.या नुसार जर विचार केला तर ट्रम्प यांच्या प्रत्येक शब्दामुळे जवळपास ९० हजार कोटींचे नुकसान झाले आहे . डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या २०० अरब डॉलरच्या उत्पादनांवर आयात कर वाढवण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर हा परिणाम पाहायला मिळाला. मागील १० महिन्यांपासून चीन ५० अरब डॉलरच्या हायटेक वस्तुंवर २५ टक्के आणि २०० अरब डॉलर किमतीच्या अन्य वस्तुंवर १० टक्के कर अमेरिकेला देत आहे. आता १० टक्क्यांवरून तो आता २५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक बाजारात मोठी पडझड

अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी उलाढाल पाहायला मिळाली. बाजारात अनेक चढउतार आले आहेत. आशियातील बाजारात मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळत आहे . यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . या सगळ्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दिसून येत आहे.