मासिक पाळीच्या वेदना होतील दूर, करा हे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – महिलांना मासिक पाळीदरम्यान वेदना होतात. अशावेळी पेनकिलर किंवा इतर औषधांचा वापर करून काही महिला वेदनांपासून सुटका करून घेतात. काही महिला तर सोशल मीडियावर सुद्धा यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. या वेदनांपासून सुटका करण्यासाठी पेनकिलर किंवा औषधांचा वापर केल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. विशेष म्हणजे काही घरगुती उपाय केल्यास मासिक पाळीत होणाऱ्या वेदना दूर होऊ शकतात.

मासिक पाळीमध्ये ब्लॉटिंग होणं स्वाभाविक आहे. अशातच जर तुम्ही मासिक पाळीच्या काही दिवस आधीपासूनच मीठाचं सेवन करणं कमी कराल तर तुमच्या किडनीला जास्त पाणी मिळण्यास मदत होते परिणामी तुमची वेदनांपासून सुटका होते. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्या डाएटवर थोडं नियंत्रण ठेवा. या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ खाण्याऐवजी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. तसेच ताज्या फळांचाही आहारात समावेश करावा. हलक्या एक्सरसाइजचा समावेश करा. त्यामुळे तुमची वेदनांपासून सुटका होईल. एक्सरसाइज केल्याने तुमची ब्लॉटिंगची समस्या दूर होईल.

पीरियड्समध्य ब्लॉटिंगमुळेच वेदना होत असतात. अशातच लाइट एक्सरसाइज केल्याने मसल्स रिलॅक्स होतात. तेजपत्तामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांव्यतिरिक्त आरोग्याशी निगडीत समस्या दूर होतात. अनेक महिला याचा वापर करतात. जर मासिक पाळीमध्ये पोटामध्ये खूप वेदना होत असतील तर हॉट बॅगचा वापर करावा. हॉट बॅगने पोटामध्ये वेदना होणाऱ्या भागामध्ये हलका शेक द्यावा. कॅफेनचं अधिक सेवन केल्याने शरीरामध्ये अ‍ॅसिडीटीची शक्यता वाढते. यामुळे या दिवसांमध्ये खॅफेनचं सेवन करून नये.