घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी घरात सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींचा वापर उपाय करता येतात. यामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो. हळद पावडर, गव्हाचे जाड पीठ आणि कच्चे दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नको असलेले केस दूर होतात. अंड्याच्या बलकामध्ये कॉर्न फ्लोर आणि साखर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळते.

मसूरची डाळ, कच्चा बटाटा, मध आणि लिंबूचा रस मिसळून चेहऱ्याच्या केसांवर लावा. यामुळे केस दूर होतील आणि रंग गोरा होईल. तसेच गव्हाच्या जाड पीठामध्ये गुलाबजल आणि दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नको असलेले केस दूर होतात. लिंबूचे साल बारीक करुन घ्या. यामध्ये ओटमील आणि ऑलिव ऑइल मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे केस रिमूव्ह होतात. जवसाच्या पीठामध्ये लिंबूचा रस आणि कच्चे दूध मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील केस दूर होतात. बडीशोप आणि मुगाची डाळ बारीक करुन घ्या. हे पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळते. हरबऱ्याची डाळ पाण्यात भिजवून बारीक करा. यामध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे केस दूर होतात आणि फेयरनेस वाढतो.

ओट्समध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याच्या केसांपासून सुटका मिळते. अंड्याच्या पांढऱ्या भागात मैदा आणि साखर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने केस गळतात. हे लावल्याने चेहऱ्यावर शायनिंग येते.

You might also like