बाजारात आला ऊसाच्या ‘वेस्ट’पासून बनलेला Face ‘मास्क’, 30 वेळा करू शकता वापर

नवी दिल्ली : कोरोनामुळे मास्कची मागणी वाढत असतानाच एक नवीन संकट म्हणजे बायोमेडिकल वेस्टचे संकटसुद्धा निर्माण झाले आहे. फेकलेले मास्क, ग्लोव्हज आरोग्यासाठी मोठी समस्या बनत आहेत. मात्र, या समस्येवर उपायदेखील शोधला जात आहे. दिल्लीची एक कंपनी एफीबरने एक असा बायोमास्क बनवला आहे, जो ऊसाच्या वेस्टपासून तयार होतो, आणि 30 वेळा वापरल्यानंतर मातीत टाकल्यानंतर डिकंपोज होतो.

एफीबर ग्रुपचे फाऊंडर राजेश भारद्वाज यांनी सांगितले की, बायोफेस मास्क एक बायोडिग्रेडेबल मास्क आहे. यामध्ये अँटी बॅक्टेरिया प्रॉपर्टीसुद्धा आहे. हा मास्क पीएलए कम्पाऊंड आणि पॉलिएटिक अ‍ॅसिडपासून तयार केला आहे. यासाठी हे बायोडिग्रेडेबल आणि अ‍ॅटी बॅक्टेरियल मास्क आहे. त्यांनी म्हटले, हा मास्क तुम्ही 30 वेळा धुवून वापरू शकतो.

बायोमास्कचे फायदे
या बायोमास्कचा फायदा हा आहे की, आपल्याला मास्क बदलण्याची जी गरज भासत आहे, ती भासणार नाही. तर, बायोमासपासून तयार झालेल्या वस्तू निसर्गाकडून घेत आहोत आणि निसर्गाला परत देत आहोत. बायोमासपासून बनवलेले मास्क वापरल्यानंतर ते मातीत टाकल्यानंतर ते डिकंपोज होतील.

बायोमास्कची टेक्नोलॉजी जपानची टीव्हीएम कंपनी लिमिटेडची आहे आणि एफिबर सोबत करार केला आहे. कंपनी लोकलायजेशनवर फोकस करत आहे. इकोनॉमी बायोमास्कची किंमत 145 ते 150 रुपये आहे, तर प्रीमियम मास्कची किंमत 450 ते 500 रुपये आहे.