Egg Combinations Are Dangerous | अंड्यासोबत ‘हे’ कॉम्बिनेशन शरीरासाठी धोकादायक; ‘या’ 5 गोष्टी कधीही खाऊ नका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Egg Combinations Are Dangerous | दररोज अंडी खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. अंड्याचे आपल्या आरोग्यासाठी असलेले फायदे यामुळेच डॉक्टरही आपल्याला अंडी खाण्याचा सल्ला देत असतात. प्रथिनेयुक्त अंडी फक्त आपले स्नायूच मजबूत करत नाहीत, तर हृदयाच्या कार्यासही खूप फायदेशीर असते. महत्वाचे म्हणजे अंडी ही ब्रेक फास्टमध्ये खाणे अति आवश्यक असते. त्याचबरोबर उकडलेले अंडे खाऊ शकता किंवा त्यापासून ऑम्लेट बनवू शकता. हे आरोग्याला फायदेशीर (Eggs Beneficial For Health) आहे. मात्र अंडी हे सगळ्याच गोष्टींसोबत खाऊ नये. नाहीतर शरीरासाठी उपयोगी असलेले अंडं तुमच्या शरीराचं नुकसानही करु शकते. तर कोणत्या पदार्थांसह अंडी (Egg Combinations Are Dangerous) खाऊ नये. याबाबत जाणून घ्या.

 

सोया दूध आणि अंडी (Soya Milk And Eggs) –
अनेक जिममध्ये जाणारे लोक अंड्यांसह सोया दूध पितात. तुम्हाला माहीत आहे का. सोया मिल्कसोबत अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील प्रथिने शोषण्याची प्रक्रिया विस्कळीत होते. (Egg Combinations Are Dangerous)

 

चहा आणि अंडी (Tea And Eggs) –
जगभरात अनेक ठिकाणी चहासोबत नाष्टा म्हणून अंडी खाल्ली जातात. कदाचित तुम्हाला माहित नसेल की, परंतु चहासोबत अंडी मिसळल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला आणखी हानी पोहोचते.

 

दुधाच्या वस्तू आणि अंडी (Dairy Products And Eggs) –
इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यासोबत अंडी कधीही खाऊ नयेत. विशेषत: खरबूजांसह अंडी कधीही खाऊ नका. तसेच बीन्स, चीज, दूध किंवा त्यापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीसोबत अंडी खाणे टाळावे. यामुळे देखील तुमच्या शरीराला धोका आहे.

भाजलेले मांस आणि अंडी (Roasted Meat And Eggs) –
अनेक ठिकाणी अंडी आणि भाजलेले मांस खाल्ले जाते. या दोन्हीमध्ये भरपूर प्रथिने आणि चरबी असल्याने, ते सुस्तीचे कारण बनू शकते.

 

साखर आणि अंडी (Sugar And Eggs) –
जर तुम्ही साखरेसोबत अंडी वापरण्याचा विचार करत असाल, तर त्याचे दुष्परिणाम देखील जाणून घ्या. वास्तविक, जेव्हा या दोन गोष्टी एकत्र शिजवल्या जातात, तेव्हा त्यातून बाहेर पडणारे अमिनो अ‍ॅसिड शरीरासाठी विषारी बनते, ज्यामुळे रक्तातील गुठळ्या होण्याची समस्या वाढू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Egg Combinations Are Dangerous | egg side effects this food combination with egg will harm your health know in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Symptoms Of Depression In Women | महिलांमधील ‘हे’ आहेत डिप्रेशनची लक्षणे; जराही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

 

Teeth Whitening | पिवळेपणा दूर करुन दात चमकदार आणि मजबूत करण्यासाठी ‘या’ आहेत 5 गोष्टी; जाणून घ्या

 

Vijay Wadettiwar | ‘उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा वाचायला ते काय तुमच्या बापाचे…’: मंत्री विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली