Egg Pack | केसांना अंडी लावल्यानंतर ‘या’ पध्दतीनं घ्या काळजी, अन्यथा होईल नुकसान; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केसांना मऊ, चमकदार बनवण्यासाठी अनेक मुली केसांना अंडे (Egg Pack) लावतात. प्रथिने, बायोटिन आणि फोलेट समृद्ध अंडी (Egg Pack) केसांची मुळांपासून दुरुस्ती करते आणि त्यांना पोषण देते. याशिवाय अंडी केसांसाठी नैसर्गिक कंडीशनर म्हणूनही काम करते, परंतु अंडी लावताना काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक आहे. सर्वात मोठी समस्या अशी आहे की अंडी लावल्यानंतर केसांचा वास येतो. आपल्याला देखील समस्या होत असेल तर उपाय जाणून घ्या…

केसांमध्ये अंडी लावण्याचा योग्य मार्ग…
हे लक्षात ठेवावे की केसांवर सरळ अंडे लावू नका तर त्यापेक्षा मेहंदी, दूध, दही, कोरफड, आवळा, केळी इत्यादी गोष्टीत मिसळून ते लावावे. यासोबत केसांना ते लावताना कंगव्याचा वापर करावा जेणेकरून ते केसांमध्ये सहज पसरेल.

केसांवर अंडी मास्क लावल्यानंतर या गोष्टी लक्षात ठेवा…

१) हे लक्षात ठेवावे की केसांमध्ये अंडी ३० ते ४० मिनिटांपेक्षा जास्त काळ ठेवू नका आणि ते वाळवू देखील देऊ नका.

२) अंडी लावल्यावर केस कधीही झाकून ठेवू नका.

३) अंडी हेअर पॅक लावल्यानंतर उन्हात कधीही जाऊ नका. उष्णतेमुळे अंडी केसांमध्येच शिजण्यास सुरुवात होते, ज्यामुळे ते काढणे कठीण होईल.

४) पॅक काढल्यानंतर केसांवर ड्रायर वापरू नका.

५) मास्क धुतल्यानंतर केसांना तेल लावण्याची चूक करू नका कारण यामुळे दुर्गंधी येऊ शकते.

 

अंडी धुऊनही केसांचा वास येत असेल तर काय करावे….

अंडी धुऊनही केसांचा वास येत असेल तर केसांना हेयर सिरम लावा. याशिवाय गुलाबाचे पाणी आणि लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. यामुळे केस खराब होणार नाहीत आणि अंड्यांचा वास देखील दूर होईल.

केस कसे स्वच्छ करावे?

१) अंडी पूर्णपणे धुण्यासाठी नेहमीच कोमट पाण्याचा वापर करा. तसेच, शैम्पू पाण्यात मिसळून केस कमीतकमी ३ वेळा धुवा.

२) केस धुताना लिंबाचा रस पाण्यात मिसळा. यामुळे अंड्याचा वास कमी होईल.

किती वेळा अंडी लावावी?

हे लक्षात ठेवा की महिन्यामध्ये अंडी फक्त १-२ वेळा लावावी कारण जास्त वापर केल्याने केस खराब होऊ शकतात.

Web Titel :- Egg Pack | after applying egg pack keep hair care like this

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’, तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम