Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खाण्याच्या सर्व वस्तूंमध्ये अंड सर्वात जास्त आरोग्यदायी फूड मानले गेले आहे. यात आढळणार्‍या पोषकतत्वांमुळे यास सुपरफूड म्हटले जाते. एका अंड्यात पूर्ण एका चिकनच्या बरोबरीने न्यूट्रिएंट्स असतात.

अंड्याचा संबंध नेहमी हाय कोलेस्ट्रॉलशी जोडला जातो आणि यासाठी लोकांना अनेकदा अंडे न खाण्याचा सल्ला दिला जातो. अंड्याचा कोलेस्ट्रॉलशी काय संबंध आहे आणि एका दिवसात किती अंडी खाणे योग्य आहे ते जाणून घेवूयात-

बहुतांश लोक कोलेस्ट्रॉलला एक वाईट गोष्ट समजतात, जे योग्य नाही. मागील काही स्टडीजमध्ये सुद्धा ही माहिती समोर आली होती की, कोलेस्ट्रॉलचा जास्त स्तर हृदयाचे आजार आणि लवकर मृत्यू यांचा संबंध आहे. परंतु, यावर संमिश्र पुरावे मिळाले आहेत.

शरीरासाठी आवश्यक आहे कोलेस्ट्रॉल
आपल्या संपूर्ण शरीराच्या योग्य फंक्शनसाठी कोलेस्ट्रॉल खुप आवश्यक आहे. पेशींमध्ये, बे्रनमध्ये कोलेस्ट्रॉलची भूमिका महत्वाची असते. टेस्टोस्टेरोन, एस्ट्रोजन आणि कोर्टिसोल सारख्या आवश्यक स्टेरॉइड हार्मोन बनवण्यात सुद्धा कोलेस्ट्रॉल मदत करतात.

आपले लिव्हर नॅचरल पद्धतीने बॉडीसाठी योग्य कोलेस्ट्रॉल बनवते आणि जेव्हा कोलेस्ट्रॉलवाले कोणतेही खाणे जास्त सेवन केले जाते तेव्हा शरीर आपोआप कोलेस्ट्रॉल बनवण्याची मात्रा कमी करते.

अंडे आणि कोलेस्ट्रॉलचा संबंध
बहुतांश लोक एका दिवसात कमी अंडी खाण्याचा सल्ला देतात, विशेषकरून अंड्यातील पिवळा भाग. एका मध्यम आकाराच्या अंड्यात 186 एमजी कोलेस्ट्रॉल असते. जे रेकमेंडेड डेली इनटेकच्या 62 टक्के असते. अंड्याच्या सफेद भागात प्रोटीन जास्त आणि कोलेस्ट्रॉल कमी आढळते.

अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉल थोडे जास्त असते. हेल्थ एक्सपर्ट आठवड्यात कमाल 2 ते 6 पिवळे भाग खाण्याचा सल्ला देतात. काही स्टडीजमध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, अंड्याचा कोलेस्ट्रॉलच्या स्तरावर कोणता प्रभाव पडतो.

या स्टडीमध्ये आढळले की, ज्या लोकांमध्ये एलडीएलचे मोठे कण असतात त्यांच्यात हृदयरोगाचा धोका कमी असतो. यासाठी अंडे खाल्ल्याने सुद्धा कोलेस्ट्रॉलचा स्तर थोडा वाढेल, परंतु यामध्ये चिंतेचे कारण नाही. हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, रोज 3 पूर्ण अंडी खाणे हेल्दी लोकांसाठी पूर्ण सुरक्षित आहे.

डायबिटीज आणि हृदयरोगांचा अंड्याशी संबंध
काही स्टडीजनुसार, जास्त अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. मात्र, काही संशोधकांचे म्हणणे आहे की, बरेचकाही व्यक्तीचे खाणे, स्मोकिंग आणि एक्सरसाइजची सवय यावर अवलंबून असते. या गोष्टीचा काही पुरावा नाही की, केवळ अंडे खाल्ल्याने हृदयाचे आजार होऊ शकतात. काही स्टडीजनुसार अंडे खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो.

एका अन्य शोधानुसार, टाइप 2 डायबिटीजच्या लोकांमध्ये जास्त अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. हेल्थ एक्सपर्टनुसार, टाइप 2 डायबिटीजचे रूग्ण तीन महिन्यांपर्यंत आठवड्यात 6 दिवसांच्या हिशेबाने प्रतिदिवस 2 अंडी खाऊ शकतात. यामुळे त्यांच्या ब्लड लिपिड स्तरावर कोणताही परिणाम होत नाही.