अंडी खाल्ल्यानं खरंच वाढते का रोगप्रतिकारक शक्ती ? त्यासाठी दिवसाला किती अंडी खावीत ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्व लोक इम्युनिटी वाढवण्यावर लक्ष देत आहेत. अंडेही यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु खरंच अंडी खाल्ल्यानं कोरोनापासून बचाव होतो का किंवा अंड्याचं सेवन केल्यानं इम्युनिटी वाढते का याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ?

अंड्यानं वाढते का रोगप्रतिकारक शक्ती ?

अंड्यामध्ये प्रोटीनसोबत व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकही भरपूर असतात. यामुळं आपली स्कीन, पचनसंस्था, केस, हाडं मजबूत होतात. यामुळं आपली इम्युनिटी वाढण्यासही खूप मदत होते.

कोरोना रुग्णाला खायला दिली जातात अंडी

तज्ज्ञांनुसार, जगभरातील कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्या डाएटमध्ये अडी अनिवार्य करण्यात आली आहेत. जो स्टाफ रुग्णांची देखभाल करत आहे त्यांनाही अंडी खायला दिली जात आहेत आणि त्यांचा इम्युन सिस्टीम स्ट्राँग ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कमी होतात कोरोनाची लक्षणं

अंड्यात अमिनो अॅसिड्स सोबतच मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स असतात. यामुळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. एका अंड्यात 7 ग्रॅम प्रोटीन आणि 85 कॅलरीजसोबत व्हिटॅमिन ए, सेलेनियम, व्हिटॅमिन बी असतं.

दिवसाला किती अंडी खावीत ?

तज्ज्ञ सांगतात की, एका वयस्क व्यक्तीनं दिवसातून दीड ते दोन अंडी खावीत. यामुळं शरीराला इंफेक्शनचा सामाना करण्यासाठी मदत मिळते. अंड्यातील झिंक सर्दी, ताप, फ्लू सारख्या समस्या ठिक करतं.