प्राचीन ड्रेस घालून मॉडेलचं ‘सेक्सी’ फोटोशूट ! फोटोग्राफरला पोलिसांकडून अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   इजिप्त (Egypt) मध्ये पोलिसांनी हुसैन मोहम्मद नावाच्या फोटोग्राफरला अटक केली आहे. या फोटोग्राफरवर आरोप आहेत की, त्यांनी जोजर पिरॅमिड नावाच्या पुरातत्त्व स्थळावर प्राचीन ड्रेस घातलेल्या एका मॉडेलचे फोटो क्लिक केले. या मॉडेलनं फिरौन स्टाईलचा प्राचीन ड्रेस घातला होता. लोकेशन सोबतच प्रशासनाचा मॉडेलच्या ड्रेसवरही आक्षेप होता.

सक्कारा नेक्रोपॉलिस असं या फोटोशूट लोकेशनचं नाव आहे. हे ठिकाण इजिप्तची राजधानी काहिरापासून 30 किमी दूर आहे. या ठिकाणाला युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं आहे.

इजिप्तची फॅशन मॉडेल सलमा अल शिमी (Salma Al Shimi) हिनं जेव्हा तिचे फोटो सोशलवर शेअर केले तेव्हा प्रचंड खळबळ उडाली. अनेकांनी तिच्यावर या फोटोंमुळं टीकाही केली. काहींनी यासाठीही उत्सुकता दाखवली की, तिथं नॉर्मल फोटो क्लिक करण्याची परवानगी आहे का.

रिपोर्टनुसार, सलमाचं म्हणणं आहे की, तिला माहीत नव्हतं की, पुरातत्त्व स्थळांवर परवानगीशिवाय फोटो क्लिक करता येत नाही. सोशलवर सलमाला अटक केल्याचं बोललं जात होतं. परंतु त्या फक्त अफवाच होत्या.

एका रिपोर्टनुसार, सलमा एका सरकारी वकिलासमोर उपस्थित झाली आणि तिनं सांगितलं की, तिला या फोटोशूटमधून इजिप्तच्या पर्यटनाला प्रोत्साहन द्यायचं होतं. लोकांच्या भावना दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता.

पुरातत्त्व विभागाचे सेक्रेटरी जनरल डॉ मुस्तफा वजीरी यांचं म्हणणं आहे की, हे खूपच अपमानकारक फोटो आहेत. जर लोकांना इतिहास, संस्कृती आणि स्मारकांना वाचवण्याबद्दल आपली जबाबदारी कळाली नाही तर त्यांना शिक्षा मिळेल.

सोशल मीडियावर काही लोक असेही आहेत, ज्यांनी या मॉडेल आणि फोटोग्राफर यांना सपोर्ट केला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, इजिप्तमध्ये पुरुषानं जर असं काम केलं तर त्याला काहीच त्रास दिला जात नाही. परंतु महिला असल्यानं समलान आणि तिच्या फोटोग्राफरला अशा प्रकारे भेदभावाचा सामना करावा लागत आहे.

 

You might also like