TikTok वर ‘बेली डान्स’ पोस्ट केल्याप्रकरणी 3 वर्षाचा तुरुंगवास, 14 लाखांचा दंड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इजिप्तची एक हाय प्रोफाईल बेली डान्सर सामा एल-मैसीला सोशल मीडियावर अनैतिक आणि भडकवणारा व्हिडिओ पोस्ट करणे खूप महागात पडले. गैरव्यवहार व अनैतिक कृत्य केल्याबद्दल कैरो कोर्टाने तिला तीन वर्षाचा कारावास आणि 30,000 पौंड (सुमारे 14 लाख रुपये) चा दंड ठोठावला आहे.

अल-मैसी ला एप्रिलमध्ये सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या तपासणी दरम्यान अटक करण्यात आली होती. तिने लोकप्रिय व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक वर आपला व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तिच्यावर लोकांची उत्तेजना वाढवल्याचा जाहीरपणे आरोप करण्यात आला आहे. त्याच वेळी, 42 वर्षीय बेली डान्सरने हे आरोप फेटाळून लावत स्वत: ला निर्दोष असल्याचे सांगितले. ती म्हणाली की व्हिडिओ फोनवरून चोरीला गेला होता आणि संमतीशिवाय शेअर केला गेला.

कैरो कोर्टाने शनिवारी निकाल देताना सांगितले की, ‘अनैतिकता’ पसरवण्याच्या उद्देशाने तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोषीने इजिप्तमधील कौटुंबिक तत्त्वांचे आणि मूल्यांचे उल्लंघन केले. कोर्टाच्या निर्णयावर खासदार जॉन तलाट म्हणाले, ‘स्वतंत्रता आणि भ्रामकता यात खूप फरक आहे. अल-मैसी आणि इतर स्त्रिया सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून कौटुंबिक मूल्यांचा नाश करीत होत्या, जे की घटनेच्या विरोधात आहे.’