Eid 2020 : अ‍ॅक्ट्रेस नुसरत भरूचानं साजरी केली ईद, तर अमिताभ बच्चन यांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : ईद म्हणजेच ईद उल फित्र चा उत्साह जगभरात दिसू लागला आहे. केरळ आणि जम्मू काश्मीरमध्ये आजच ईद साजरी केली जात आहे. तर, अन्य देशात 24 मे रोजी चंद्र दिसल्यावर, 25 मेराजी ईद साजरी केली जाईल. दरम्यान ईदसाठी बॉलीवुडकडूनही शुभेच्छा येऊ लागल्या आहेत. बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करून सर्व लोकांना विश केले आहे.

अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये ते सफेद कपड्यात दिसत आहेत. पोस्टवर कॅपशनमध्ये लिहिले आहे – सर्वांना ईदच्या शुभेच्छा आणि शांतता, सदभावना आणि चांगल्या आरोग्यासाठी या शुभ दिनी प्रार्थना करा. कायम असलेली मैत्री आणि प्रेमासाठी सुद्धा. ती आपल्यात शांती आणि प्रेम, बंधुत्व आणि कुटुंबाच्या एकतेची भावना घेऊन यावी.

अमिताभ बच्चन यांच्यासह नुसरत भरूचाने सुद्धा ईदनिमित्त पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये नुसरतने अनेक फोटो शेयर केले आहेत, ज्यामध्ये ती शेवाया खाताना दिसत आहे. याशिवाय तिने फोटो शेयर करताना लिहिले आहे की, – तुम्हा सर्वांना बोहरी ईदच्या शुभेच्छा. माझ्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला. अ‍ॅक्ट्रेस नुसरत भरूचा बोहरा कम्युनिटीशी संबंधित आहे. म्हणून तिने रविवारी ईद साजरी केली आहे.

लॉकडाऊनमुळे यावर्षी ईदमध्ये जास्त झगमगाट दिसत नाही. लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत. याशिवाय असे अनेक सेलेब्स आहेत, जे ईद साजरी करतात. यामुळे फॅन्सला आपल्या आवडत्या सेलेब्सचे ईद साजरी करतानाचे फोटो 25 मेपर्यंत पहावयास मिळणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like