मुस्लिम बांधवांनी रमजान ईद घरातच साजरी करावी : PI प्रताप मानकर

वाघोली : वाघोली (ता:हवेली) येथील मुस्लिम बांधवानी अत्यंत साध्या पध्दतीने घरातच औपचारिक विधी पार पाडत यंदा रमजान ईद घरातच साजरी करावी ,असे आवाहण लोणिकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले.

देशासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे उद्योग,व्यवसाय, कारखाने सर्व काही बंद असल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथेल मज्जीत मध्ये बैठक घेण्यात आली.यावेळी हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या नियंत्रणनाखाली लोणिकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस अधिकारी यांच्या मदतीने वाघोली, केसनंद,कोलवडी येथील अनेक गरीब व गरजू मुस्लिम बांधवांसाठी रोजाच्यासाठीचे खाद्य पदार्थ किट व शिधा किट ,गरजू कुटुंबांना अन्न धान्य,किराना सामानाचे किटचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना रोगाची परिस्थिती पाहता यावर्षी ईदगाह अथवा मस्जिदमध्ये सामूहिक नमाज पठण न करता , मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज पठण करावे व संपूर्ण विश्वकल्याण्यासाठी प्रार्थना करावी,असे आवाहण लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like